मात्र आता मोदींच्या निर्णयाचं समर्थन करणाऱ्यांच्या यादीत टीम इंडियाच्या डॅशिंग खेळाडूची भर पडली आहे. भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
भारतीय राजकारणात आतापर्यंत जेवढे निर्णय घेतले आहेत, त्यापेक्षा सर्वोत्तम निर्णय म्हणून या निर्णयाकडे पाहतो, असं कोहली म्हणाला. इतकंच नाही तर या निर्णयाचं मी खुल्या दिलाने स्वागत करतो, मी या निर्णयाने खूपच प्रभावित झालो आहे, असंही कोहलीने म्हटलंय.
यापूर्वी माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही मोदींच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. शहीद जवान हनुमंथप्पा देशासाठी बर्फाखाली 6 दिवस राहिले, आपण काही तास वाट पाहू शकत नाही का, असा सवाल सेहवागने विचारला होता.
याशिवाय माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही 500-1000 च्या नोटाबंदी निर्णयाचं समर्थन केलं आहे.
तर अभिनेता नाना पाटेकरनेही नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
अभिनेता सलमान खानने 'बिग बॉस'मध्ये 500-1000 च्या नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. काळ्यापैशाविरोधात कारवाई करण्यासाठी पाऊल उचलल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलाम, असं सलमान म्हणाला होता.
याशिवाय अभिनेता आमीर खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अजय देवगण, कपिल शर्मा यांनीही स्वागत केलं होतं.