"पश्चिमेकडील देशातील प्रत्येक क्षेत्राही असं घडतं. भारतातही जर एखाद्या क्षेत्रात विकास झाला तर मध्यम स्तरावरील कर्मचारी जे कंपनीत पगारानुसार योगदान देत नाहीत, ते नोकरी गमावू शकतात," असं पै यांनी सांगितलं.
मध्यम स्तराच्या कर्मचाऱ्यांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार
पै म्हणाले की, "जेव्हा एखाद्या क्षेत्रात विकास होतो तेव्हा मध्यम स्तरावर काम करणाऱ्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या तुलनेत कंपनीत योगदान देता येत नाही. यामुळे प्रत्येक देशातील प्रत्ये क्षेत्रात विकास होतो, तेव्हा बऱ्याच कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं जातं."
"जर एखादी कंपनी विकास करत असेल तर प्रमोशनही मिळतं आणि पगारात वाढही होते. त्या परिस्थितीत कंपनीला काही फरक पडत नाही. पण कंपनीचा विकास थांबला तर व्यवस्थापनाला आपल्या पिरॅमिडवर पुन्हा एकदा लक्ष द्यावं लागतं. अशा परिस्थितीत मध्यम आणि उच्च स्तरावरील कर्मचारी, ज्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त पगार मिळतो, त्यांच्यावर परिणाम होतो आणि त्यांना नोकरी गमवावी लागते," असंही मोहनदास पै यांनी नमूद केलं.
दर पाच वर्षांनंतर अशी परिस्थिती येणार : मोहनदास पै
"इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या बदलांमुळे अशी परिस्थिती दर पाच वर्षांनंतर येते. जर कोणाला गडगंज पगार मिळत असेल, तर त्याला त्याच्या तुलनेत जास्त योगदान द्यावं लागतं. यामध्ये अपयश आल्यास त्याला नोकरी गमवावी लागू शकते. आयटी सेक्टरमध्ये ज्या लोकांची नोकरी जाईल, त्यांच्याकडे दुसरी संधीही उपलब्ध असेल. पण यासाठी त्यांना स्वत:ला काळानुसार अपडेट राहावं लागेल," असं मोहनदास पै यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या
- आर्थिक मंदीचा फटका! इन्फोसिस 12 हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ
- भारताची अर्थव्यवस्था एक व्यक्ती चालवू शकत नाही : रघुराम राजन
- मंदीच्या काळात कळवणच्या शेतकऱ्यांची चांदी, एकाच दिवशी खरेदी केले 250 ट्रॅक्टर