सियाचीनमध्ये हिमस्खलनामुळे बर्फाखाली दबून सहा जवान शहीद, दोन बेपत्ता

सियाचिन ग्लेशियर काराकोरम पर्वत रांग 20 हजार फुट उंचीवर आहे. हे जगातील सर्वात उंच क्षेत्र आहे जिथे जवानांचा पहारा असतो. थंडीच्या मोसमात जवानांना नेहमीच बर्फांच्या वादळांचा सामना करावा लागतो. वादळांमुळे या ठिकाणी नेहमी हिमस्खलन होते.

Continues below advertisement
नवी दिल्ली : जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी असणाऱ्या सियाचीनमध्ये हिमस्खलनामुळे बर्फाखाली गस्तीपथकाचे आठ जवान दबले. यात सहा जवान शहीद झाले असून दोन जवान अजून बेपत्ता आहेत. आज दुपारी ही घटना घडली. बचावकार्य सुरू असून दोन जवानांना वाचवण्याचे सारे प्रयत्न केले जात आहेत. उत्तर सियाचिनमध्ये जवानांची एक आठ सदस्यीय तुकडी बर्फाच्या वादळाच्या तडाख्यात सापडली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास बर्फाचं वादळ आलं. या वादळात हे जवान अडकले. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी जवानांची ही तुकडी गस्तीवर होती. सियाचिन ग्लेशियर काराकोरम पर्वत रांग 20 हजार फुट उंचीवर आहे. हे जगातील सर्वात उंच क्षेत्र आहे जिथे जवानांचा पहारा असतो. थंडीच्या मोसमात जवानांना नेहमीच बर्फांच्या वादळांचा सामना करावा लागतो. वादळांमुळे या ठिकाणी नेहमी हिमस्खलन होते. तापमान शून्य ते 60 डिग्री उणे असल्याने जवानांना आणखी त्रासाचा सामना करावा लागतो. भारतीय सैन्याकडून या भागात एक ब्रिगेड तैनात करण्यात आली आहे. या ठिकाणच्या काही चौक्या 6,400 मीटर उंचीवर आहेत. या भागात आधीच अत्यंत प्रतिकूल स्थितीत जवानांना पहारा द्यावा लागतो. आज गस्तीपथकातील आठ जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्यानंतर माहिती मिळताच तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. मात्र सहा जवान शहीद झाले तर दोन जवान अजून बेपत्ता आहेत. या दोन जवानांचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola