भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)कडून जीसॅट-6 ए उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. उच्च शक्तीच्या एस बँड संचार उपग्रहाने युक्त असलेल्या या उपग्रहाचं आयुष्यमान दहा वर्ष आहे.
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)कडून जीसॅट-6 ए या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. उच्च शक्तीच्या एस बँड संचार उपग्रहाने युक्त असलेल्या या उपग्रहाचं आयुष्यमान दहा वर्ष आहे. हा उपग्रह जियोसिनक्रोनस उपग्रह प्रक्षेपण याना (जीएसएलव्ही-एफ 08)द्वारे अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला. श्रीहरिकोटा केंद्रावरून GSLV-F08 हे यान दुपारी 4 वाजून 56 मिनिटांनी अवकाशात झेपावलं. या मोहिमेचं काऊंटडाऊन बुधवारी दुपारी 1 वाजून 56 मिनिटांनी सुरु झाल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं होतं. ‘जीसॅट-6’ प्रमाणेच ‘जीसॅट-6 ए’ हा उपग्रह असल्याचे इस्रोने स्पष्ट केलं असून, या उपग्रहामुळे आयटी इंजिनियर्सना आपले नवनवे उपक्रम तयार करण्यासाठी मदत मिळेल. या उपग्रहाची वैशिष्ट्ये
या उपग्रहात 6 एमएस बँड अनफ्लेरेबल अॅन्टिना, हॅडहेल्ड ग्राऊंड टर्मिनल आणि नेटवर्क व्यवस्थापन तंत्रज्ञान आदीचा समावेश आहे.
या उपग्रहाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यात मल्टी बीम कव्हरेज सुविधा उपलब्ध आहे. ज्यामुळे भारताला मोबाईल संचार प्राप्त होईल.
'जीसॅट-6 ए'च्या प्रक्षेपणानंतर पुढील आर्थिक वर्षात एक नेव्हीगेशन उपग्रहाचंही प्रक्षेपण होणार असल्याचं इस्रोचे संचालक के सिवन यांनी सांगितलं.