Aditya L1 Launch LIVE : इस्रोच्या 'आदित्य L-1' ची सूर्याकडे यशस्वी झेप, शास्त्रज्ञांसह देशभरात जल्लोष

Aditya L1 Launch Live: श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आदित्य एल1चे प्रक्षेपण करण्यात आलं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Sep 2023 01:22 PM
Aditya L1 Launch LIVE : इस्रोच्या शास्रज्ञांचे उद्धव ठाकरेंनी केलं अभिनंद

Aditya L1 Launch LIVE :  आदित्य एल 1 चं यशस्वी प्रक्षेपण झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी इस्रोच्या शास्रज्ञांचे अभिनंदन केलं आहे. 

Aditya L1 Launch LIVE : 'भारत माता की जय' च्या घोषणा 

Aditya L1 Launch LIVE : श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून  आदित्य एल 1 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर 'भारत माता की जय' या घोषणा दिल्या आहेत. 



Aditya L1 Launch LIVE : आदित्य एल 1 च्या प्रक्षेपणानंतर जनतेच्या प्रतिक्रिया 

Aditya L1 Launch LIVE : आदित्य एल 1 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर लोकांनी सतीश धवन अवकाश केंद्रामध्ये जल्लोष साजरा केला. हा आमच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण असल्याची प्रतिक्रिया यावेळी लोकांनी दिली आहे.



तिसऱ्या टप्प्यात पेलोडपासून यान वेगळं 

इस्रोचे आदित्य एल1 अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणातून बाहेर पडताना पेलोड वेगळे झाले आहे. सध्या इस्रोच्या माहितीनुसार,  तिसरा टप्पा वेगळा करण्यात आला आहे.


 





Aditya L1 Launch LIVE : आदित्य एल1 चे प्रक्षेपण, भारताचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु

Aditya L1 Launch LIVE : श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून इस्रोचे आदित्य एल 1 चे प्रक्षेपण करण्यात आले आहे. 


 

Aditya L1 Launch LIVE : 'चोवीस तास सातही दिवस होणार परिक्षण', माजी इस्रो प्रमुखांची प्रतिक्रिया 

Aditya L1 Launch LIVE :  सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1 मोहिमेवर इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी म्हटलं की, "ही मोहीम अतिशय महत्त्वाची आहे. आदित्य एल-1 हे लॅग्रेंज पाईंट 1  च्या आजूबाजूला ठेवण्यात येईल, जिथे पृथ्वी आणि सूर्याची गुरुत्वाकर्षण नसते. याशिवाय आता चोवीस तास आणि सातही दिवस सूर्याचा अभ्यास करणं शक्य होणार आहे. 



Aditya L1 Launch LIVE : मिशन आदित्यचे थेट प्रक्षेपण सुरु

Aditya L1 Launch LIVE : अगदी काही मिनिटांमध्ये भारत सूर्याच्या दिशेने झेप घेणार आहे. या संपूर्ण प्रवासाचे थेट प्रक्षेपण इस्रोच्या अधिकृत संकेस्थळावर सुरु करण्यात आले आहे. 

Aditya L1 Launch LIVE : आदित्य एल1 प्रक्षेपण पाहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता 

Aditya L1 Launch LIVE :  सूर्याचा अभ्यास करण्यसाठी पाठवण्यात येणाऱ्या आदित्य एल1 चे प्रक्षेपण पाहण्यसाठी विद्यार्थी पोहचले आहेत. 



Aditya L1 Launch LIVE : 'अशा पद्धतीची ही पहिलीच मोहीम', आदित्य एल1 वर अन्नपूर्णा सुब्रमण्यम यांची प्रतिक्रिया 

Aditya L1 Launch LIVE :  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सच्या संचालिक अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ' अशा प्रकारची ही पहिलीच मोहीम आहे. आम्ही या मोहीमेसाठी कोरोनाग्राफ (व्हीईएलसी)  तयार करुन दिले आहे. ज्यामुळे सूर्याची छायाचित्रं मिळवता येणार आहे. ग्रहण काळात देखील ते व्यवस्थित काम करेल.' 



Aditya L1 Launch LIVE : पीएसएलव्हीच्या होणार आदित्यचा 'सारथी' 

Aditya L1 Launch LIVE : पोलार सॅटेलाईट लाँच व्हीकल म्हणजेच पीएसएलव्हीच्या साहाय्याने आदित्य एल1 हे सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. या रॉकेटला इस्रोचा वर्कहॉर्स म्हटलं जातं. आतापर्यंत पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने 104 उपग्रह प्रक्षेपित कऱण्यात आली आहेत. 

Aditya L1 Launch LIVE : मिशन आदित्यच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी वाराणसीमध्ये होमहवन 

Aditya L1 Launch LIVE :  आज श्रीहरिकोटा येथून होणाऱ्या मिशन आदित्यच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी वाराणसीमध्ये होम हवन करण्यात येत आहे. 


 



Aditya L1 Launch LIVE : श्रीहरिकोटा येथून केले जाणार लाँचिंग

Aditya L1 Launch LIVE : श्रीहरिकोटा येथूल लाँचिंग तयारी सध्या सुरु करण्यात आली आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून हे लाँचिंग करण्यात येणार आहे. 





पार्श्वभूमी

Aditya L1 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थताच इस्रोची सूर्य मोहीम ही शनिवार (2 सप्टेंबर) रोजी अवकाशात झेपावणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर इस्रोकडून तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून या यानाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दहा दिवसांपासून म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवून भारताने इतिहास रचला होता. तसचे चांद्रयान मोहीम अजूनही कार्यरत आहे. चांद्रयान-3 च्या लाँचिंगनंतर जवळपास 50 दिवसांनंतर इस्रोच्या मिशन आदित्यचे लाँचिंग करण्यात येणार आहे. आदित्य एल 1 हे यान सूर्याच्या कक्षेत राहून सूर्याचा अभ्यास करणार आहे. 


चांद्रयानाचं कौतुक पूर्ण होत नाही तोवरच इस्रो आणखी एक इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताची ही पहिलीच सूर्य मोहीम असून सूर्याचा अभ्यास आता इस्रो करणार आहे. आदित्य एल1 हे सूर्याच्या वातावरणचा अभ्यास करेल. तसेच याद्वारे सूर्याच्या बाह्य थराची देखील माहिती मिळवली जाणार आहे. हे यान जवळपास 15 लाख किलोमीटरचा प्रवास करणार आहे. 


ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्तीचा समतोल साधला जातो त्या ठिकाणी हे यान काम करेल. म्हणजेच आदित्य एल1 हे लॅग्रेंज पॉईंट 1 वरुन सूर्याचा अभ्यास करणार आहे. तसेच या पॉईंटवरुन सूर्यग्रहणाचा किंवा सूर्यावरील कोणत्याही हालचालींचा परिणाम उपग्रहावर होणार नाही. ज्या ठिकाणी हे यान उतरवण्यात येईल त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षाणाचा प्रभाव जाणवणार नाही. जेणेकरुन सूर्याच्या किंवा पृथ्वीच्या दिशेने पुन्हा हे यान खेचले जाणार नाही. भारताचं मिशन आदित्य हे सूर्याची अनेक रहस्य उलगडण्यसाठी इस्रोला मदत करणार आहे. 


या लाँचिंगची प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये PSLV हे रॉकेट लाँच केले जाईल. पीएसएलव्हीच्या साहाय्याने या यानाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर पृथ्वीच्या कक्षेमध्ये जाईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये आदित्य एल1 हे पृथ्वीची कक्षा हळूहळू पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर पृथ्वीच्या कक्षेतून हे यान बाहेर काढले जाईल. तिसऱ्या टप्प्यामध्ये हे यान पृथ्वीच्या गरुत्वाकर्षणच्या प्रभावातून बाहेर काढले जाईल आणि शेवटच्या टप्प्यात आदित्य एल1 हे त्याच्या जागी स्थापित केले जाईल. 


या संपूर्ण प्रक्रियेसाठी जवळपास 125 दिवसांचा कालावधी लागणार आहे. म्हणजेच हे यान त्याच्या जागी जाण्यासाठी त्याला चार महिन्यांचा प्रवास करावा लागेल. भारताच्या या महत्त्वकांक्षी मोहिमेकडे आता जगाचं लक्ष लागून राहिलं असून लवकरच भारत नवा इतिहास रचणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.