मुंबई: भारताचे चांद्रयान 3 (Chandrayaan 3) हे चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग झाल्यानंतर इस्त्रोचे (ISRO) सर्वत्र कौतुक होत आहे, या यशात वाटा असलेल्या शास्त्रज्ञांचंही तोंडभरून कौतुक केलं जात आहे. तर दुसरीकडे एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इस्त्रोच्या चांद्रयानाचे लॉंचिंग पॅड बनवणाऱ्या HEC (हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड) मधील एका तंत्रज्ञावर रस्त्यावर इडली (Idli) विकायची वेळ आली आहे. गेल्या 18 महिन्यांपासून त्यांना पगारच दिला नसल्याचं समोर आलं आहे. बीबीसीने यासंबंधी एक वृत्त दिले. इडली विकणाऱ्या या तंत्रज्ञाचं नाव दीपक कुमार उपरारिया (Deepak Kumar Uprariya) असं आहे.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, रांचीच्या धुर्वा भागात दीपक उपरारिया यांचे जुन्या विधानसभेसमोर एक दुकान आहे. HEC - चांद्रयान-3 साठी फोल्डिंग प्लॅटफॉर्म आणि स्लाइडिंग दरवाजा बनवणारी भारत सरकारची कंपनी (CPSU) ने 18 महिन्यांचा पगार न दिल्याने त्यांनी रस्त्याच्या कडेला स्टॉल उघडला.
चांद्रयान-3 ने ऑगस्टमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले आणि यासह भारत हा विक्रम करणारा पहिला देश बनला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आणि चांद्रयान मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या इस्त्रोच्या कर्मचाऱ्यांना संबोधित केले. पण त्याच वेळी रांचीमधील एचईसीचे कर्मचारी त्यांच्या 18 महिन्यांपासून थकलेला पगार मिळावा अशी मागणी करत होते.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, एचईसीच्या सुमारे 2,800 कर्मचाऱ्यांना गेल्या 18 महिन्यांपासून पगार मिळाला नाही. दीपक उपरारिया हे त्यापैकीच एक आहेत. दीपक उपारिया हे सकाळी इडली विकतात आणि दुपारी ऑफिसला जातात. तर ऑफिस सुटल्यानंतर संध्याकाळी पुन्हा ते इडली विकतात.
ही बातमी वाचा :