LIC Policy Revival: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी आहे. LIC चे देशभरात करोडो पॉलिसीधारक आहेत. अनेक वेळा लोक पॉलिसी खरेदी करतात, परंतु काही कारणास्तव त्यांना त्यांचा हप्ता भरता येत नाही. त्यामुळं प्रीमियम जर वेळेवर भरला नाही तर पॉलिसी लॅप्स होते (LIC Lapsed Policy). त्यामुळं अशा वेळेस नेमकं काय करायचं? लॅप्स झालेली पॉलिसीचे पुनरुज्जीवन कसे करावे, याच संदर्भातील माहिती आपण पाहणार आहोत.  


30 सप्टेंबर 2023 पर्यंत LIC ची विशेष मोहिम 


वेळेवर प्रीमियम न भरल्यामुळे तुमची पॉलिसी लॅप्स होते. त्यामुळं तुमची जर कोणतीही जुनी पॉलिसी लॅप झाली असेल, तर तुम्ही ती पुन्हा सुरु करु शकता. यासाठी LIC ने 1 ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान लॅप्स पॉलिसी रीस्टार्ट करण्यासाठी विशेष मोहीम चालवली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या नियमांनुसार, जर एखाद्या पॉलिसीधारकाची पॉलिसी प्रीमियम न भरल्यामुळे रद्द झाली असेल, तर त्याची पॉलिसी पुन्हा चालू करण्यासाठी, तुम्हाला थकबाकी प्रीमियमसह काही दंड भरावा लागेल. थकित प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसी पुन्हा सुरु होईल. यानंतरच तुम्ही त्याच्याशी संबंधित सर्व फायदे घेऊ शकता.


लॅप्स पॉलिसी पुन्हा सक्रिय कशी करावी


तुमची कोणतीही एलआयसी पॉलिसी बंद झाली असेल आणि तुम्हाला ती पुन्हा सुरू करायची असेल, तर त्यासाठी एलआयसीशी संपर्क साधा. यासाठी तुम्ही ईमेलद्वारे एलआयसी कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता. पुनरुज्जीवनासाठी, सर्वप्रथम एलआयसी शाखेत जा आणि LIC पुन्हा सुरु करण्यासाठी फॉर्म सबमिट करा. यानंतर तुम्ही प्रीमियम आणि दंड भरुन तुमची पॉलिसी पुन्हा सुरु करु शकता.


जीवन विमा योजनांमुळं आर्थिक निधी तयार करण्यात मदत


जीवन विमा योजना तुम्हाला जीवन संरक्षणाच्या संरक्षणासह आर्थिक निधी तयार करण्यात मदत करून ती उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करतात. जीवन विमा योजना शिस्तबद्ध बचतीची सवय लावतात. त्यामुळे आतापासून अनेक वर्षांनी, तुमची अधिक भरीव आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी संपत्ती जमा झाली असेल. LIC हा गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग आहे. एलआयसीने आपल्या ग्राहकांना गुंतवणुकीचे अनेक चांगले पर्याय दिले आहेत. यामध्ये गुंतवणुकीनंतर नफ्यासह विमा संरक्षण मिळते.


महत्त्वाच्या बातम्या:


LIC : एलआयसी एजंट्सला बाप्पा पावला! केंद्र सरकारची मोठी घोषणा 13 लाख लोकांना होणार फायदा