Israel Hamas Conflict : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची भूमिका महात्मा गांधींच्या काळापासून कायम सकारात्मक आहे आणि भारताच्या जागतिक स्तरावरीली वाढत्या महत्त्वामुळे तसेच पश्चिम आशियातील सर्व देशांशी असलेल्या मैत्रिपूर्ण संबंधामुळे भारत इस्त्रायल आणि हमासच्या संघर्षामध्ये (Israel Hamas Conflict)  महत्त्वाची भूमिका बजावू शकतो असं वक्तव्य पॅलेस्टाईनचे राजदूत अदनान अबू अलहैजा ( Adnan Abu Alhaija) यांनी केलं आहे. पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं. 


'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत अदनान अबू अलहैजा यांनी सांगितलं की, भारत हा इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel Palestine Conflict) या दोघांचा मित्र'आहे आणि या दोन देशांमधील तणाव कमी करण्यासाठी आणि पॅलेस्टाईन समस्येच्या निराकरणासाठी योगदान देण्यास सक्षम आहे. 


अदनान अबू अलहैजा म्हणाले की, भारत हा या प्रश्नावर युरोपीय देश, अमेरिका, पश्चिम आशियातील देशांशी संपर्क साधू शकतो आणि शांततेसाठी काम करण्यासाठी इस्रायलवर दबाव टाकू शकतो. पॅलेस्टाईनचा मुद्दा काय आहे हे भारताला सुरुवातीपासूनच माहीत आहे. महात्मा गांधींच्या काळापासून भारताने पॅलेस्टाईनच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. भारत हा इस्त्रायल तसेच पॅलेस्टाईनचा मित्र देश असल्यामुळे या दोन देशांदरम्यान शांतता नांदावी यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. 


 






Israel Palestine Conflict : भारताने मध्यस्थाची भूमिका बजावावी का?


पॅलेस्टाईनचे राजदूत अदनान अबू अलहैजा ( Adnan Abu Alhaija) म्हणाले की, भारत पॅलेस्टाईनच्या लढ्याचा समर्थक आहे. तसेच या प्रश्नामध्ये मोठी भूमिका बजावू शकतो. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशादरम्यान शांतता नांदावी यासाठी भारताने मध्यस्थी करावी अशी मागणी त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे दोन वर्षापूर्वीच पॅलेस्टाईनने केली होती. 


शनिवारी गाझामधील हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलवर केलेल्या  हल्ल्यानंतर आता इस्त्रायलाने आक्रमक भूमिका घेत त्या ठिकाणी बाँबगोळ्यांचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत या लढाईत केवळ चारच दिवसात 1,600 हून अधिक लोक मारले गेले आहेत. त्यामुळे पश्चिम आशियामधील तणाव वाढला आहे आणि त्याचा परिणाम हा जगभर जाणवत आहे. 


ही बातमी वाचा: