Madhura Naik: इस्रायल आणि पॅलेस्टिनीमधील संघर्ष अधिक तीव्र झाला असून या संघर्षातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच नागिन फेम मधुरा नाईकवर (Madhura Naik) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मधुरानं इस्रायल-हमास युद्धात तिच्या कुटुंबातील सदस्यांना गमावले आहे. नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर करुन मधुरानं तिच्या बहिणीच्या आणि तिच्या भाऊजींच्या निर्घृण हत्येबाबत सांगितलं आहे.
मधुरा नाईकनं सोशल मीडियावर तिच्या बहिणीचे आणि तिच्या कुटुंबाचे काही फोटो शेअर केले. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, "ओडाया, पॅलेस्टिनी दहशतवाद्याने माझ्या बहिणीची आणि तिच्या पतीची त्यांच्या मुलांसमोर निर्घृणपणे हत्या केली, आज (रविवार) ते मृतावस्थेत सापडले."
पुढे मधुरानं पोस्टमध्ये लिहिलं, "दहशतवादी हल्ल्यात माझ्या बहिणच्या आणि माझ्या भाऊजींच्या दु:खद निधनामुळे खूप दु:ख झाले आहे. तिची कळकळ, दयाळूपणा आणि प्रेम माझ्या नेहमीच लक्षात राहील. आम्ही तिच्यासाठी आणि सर्व पीडितांसाठी प्रार्थना करत आहोत. त्यांना शांती लाभो. कृपया या अडचणीच्या काळात आमच्या आणि इस्रायलच्या लोकांच्या पाठीशी उभे रहा. लोकांना या दहशतवाद्यांचे वास्तव आणि ते किती अमानवी असू शकतात, हे पाहण्याची वेळ आली आहे." मधुरानं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी मधुराच्या बहिणीला आणि तिच्या बहिणीच्या पतीला श्रद्धांजली वाहिली आहे.
मधुरानं एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, "मी मधुरा नाईक, भारतीय वंशाची ज्यू आहे. 7 ऑक्टोबरपूर्वी आम्ही आमच्या कुटुंबातील एक मुलगी आणि एक मुलगा गमावला."
पाहा व्हिडीओ:
हमासने गुप्तपणे इस्रायलवर (Israel) प्राणघातक हल्ला चढवला, त्यानंतर इस्रायलने देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. हमासला (Hamas) संपवून टाकण्याचं इस्रायलने ठरवलं आहे. हमास (Hamas) ही पॅलेस्टिनी (Israel-Palestine Conflict) दहशतवादी संघटना आहे.
संबंधित बातम्या: