IRCTC : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांना रेल्वे आता खास सुविधा देणार आहे. बऱ्याच वेळा अचानक प्रवास करावा लागतो. त्यामुळे तत्काळमध्ये बुकिंग करावे लागते. परंतु,आता यापुढे तुम्ही तत्काळमध्ये अगदी सहज तिकीट बुक करू शकता.
IRCTC ने तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी खास अॅप लाँच केले आहे. या अॅपमध्ये तुम्ही तत्काळ तिकिटे एका क्षणात बुक करू शकता. हे अॅप तुम्हाला आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे. तिकीट बुक करत असताना प्रवाशांच्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु, तत्काळ तिकीट बुकिंगची समस्या सोडवण्यासाठी रेल्वेने हे अॅप लॉन्च केले आहे. याद्वारे तुम्हाला सहज तिकिटे मिळणार आहेत.
रेल्वेने दिलेल्या या सुविधेमुळे सतत प्रवास करणारे आणि ऑनलाईन तिकीट बुक करणांची मोठी सोय होणार आहे. रेल्वेने लॉंच केलेल्या या अॅपमध्ये तुम्हाला तत्काळ कोट्यात उपलब्ध असलेल्या जागांची माहिती मिळणार आहे. याशिवाय तुम्ही ट्रेन नंबर टाकून रिकाम्या जागांची संख्या देखील तपासता येणार आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून कन्फर्म तिकीट नावाने डाउनलोड करता येणार असून तिकीट बुकिंगसाठी एक मास्टर लिस्ट देखील मिळेल. या लिस्टद्वारे तुम्ही सहजपणे आपले तिकीट बुक करू शकाल.
रेल्व्याच्या या नव्या अॅपवरून सकाळी दहा वाजल्यापासून तत्काळ तिकीट बुक करता येणार आहे. याशिवाय तुम्हाला ऑनलाइन पेमेंटही करता येणार आहे. परंतु, महत्वाची बाबा म्हणजे तिकीट काढल्यानंतरही तिकीट वेटिंगमध्ये असू शकते.
महत्वाच्या बातम्या
- IRCTC Food Service : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आजपासून ट्रेनमध्ये मिळणार शिजवलेलं अन्न
- Chenab Railway Bridge : जम्मू काश्मीरमध्ये बनतोय जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, सुंदर फोटो पाहिलात का?
- रेल्वे प्रवास सुस्साट होणार! तीन वर्षात 400 'वंदे भारत' ट्रेन धावणार; निर्मला सीतारमण यांची घोषणा
- Indian Railways New Rules : रात्रीच्या रेल्वे प्रवासात गोंगाट करणाऱ्यांना दणका, रेल्वेची नवी नियमावली