IPS Ajinkya Mane Sucsess Story : भारतीय प्रशासनिक सेवेत जाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. यासाठी जीवतोड मेहनत देखील अनेकजण घेत असतात. मात्र यात काहींना यश मिळते तर अनेकजणांच्या हाती अपयशच येतं. आपल्या मेहनतीनं आणि जिद्दीनं UPSC परीक्षा पास होत आयपीएस झालेल्या अजिंक्य माने (IPS Ajinkya Mane) यांनी UPSCची तयारी कशी करावी याबाबत मूलमंत्र दिला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC) इस्लामपूरच्या अजिंक्य माने यांनी देशात 424 व्या क्रमांकाने यश संपादन केलं आहे.


2021 साली झालेल्या यूपीएससी परीक्षेत अजिंक्य माने यांनी यश मिळवलं. विशेष म्हणजे अजिंक्य माने यांनी इस्लामपूरमध्ये राहूनच परीक्षेची तयारी केली अन् हे यश मिळवलं. अजिंक्य माने सांगतात की, आज इंटरनेट आणि मोबाईल सर्वांकडे आहे. या गोष्टींचा चांगला वापर करुन तुम्ही कुठेही राहून तयारी करु शकता. मी इस्लामपूरमध्ये राहूनच तयारी केली. परीक्षेची तयारी करण्यासाठी कुठल्याही वातावरणाचा नाही तर तुमच्या आत्मविश्वासाची जास्त गरज आहे, असं अजिंक्य माने सांगतात.


अजिंक्य माने यांनी 'माझा UPSC चा प्रवास' असं म्हणत एक ट्वीट केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, मी ज्यावेळी शाळेमध्ये जायचो त्यावेळी विद्यार्थी विशेषः पालकांकडून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे शाळेपासून UPSC ची तयारी कशी करावी? कोणतीही स्पर्धा परीक्षा ही परीक्षा असली तरी ती तुमच्या व्यक्तिमत्वाची कसोटी आहे, असं माने यांनी सांगितलं.


कोणतीही स्पर्धा परीक्षा यशस्वी करायला तीन गोष्टींची आवश्यकता 


1- अभ्यासाची सवय जी शालेय जीवनापासून लागू शकते.
2- आकलन क्षमता, गोष्टी समजून घेण्याची आवड.
3- संयम जो स्पर्धा परीक्षामध्ये गरजेचा आहे.


त्यामुळे शाळेपासून अभ्यासाची सवय लावली पाहिजे जी तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये कामी येईल, असं माने सांगतात. 


 अवांतर वाचनाची आवड चांगली


माने यांनी सांगितलं आहे की, अवांतर वाचनाची आवड असणं चांगलं आहे. चांगली पुस्तके वाचल्यावर तुमची आकलन क्षमता वाढेल आणि तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी फायदा होईल . तसेच वर्तमानपत्र जे मराठीही चालेल वाचायची सवय असेल तर परत तयारी करताना तुम्हाला अडचण येणार नाही कारण बरेच विद्यार्थी वर्तमानपत्र वाचायचे टाळतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.






एखादा छंद किंवा खेळ असेल तर नक्कीच फायदा 


UPSC मध्ये छंद, खेळ यांना देखील महत्व आहे. म्हणून एखादा छंद किंवा खेळ असेल तर नक्कीच फायदा होईल. त्यामुळे UPSC ची तयारी शाळेपासून करायची म्हणजे जो अभ्यास आहे तो नीट करायचा त्यामुळे तुम्हाला अभ्यासाची सवय लागेल जी खूप गरजेची आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यासाची आवडच पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. 


माने म्हणतात, शाळेतील अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण पुढे तोच आपल्या करिअरचा पाया आहे. पालकांनी सुद्धा मुलाला, मुलीला आवड असेल त्या गोष्टींसाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे. पहिल्या प्रयत्नामध्ये जे यशस्वी होतात त्यांना या गोष्टींचा फायदा होतो, असं त्यांनी सांगितलं आहे. 


ही बातमी देखील नक्की वाचा


success story : ही कुणी हिरोईन नाही तर धडाकेबाज IAS अधिकारी! सुंदरतेत दिग्गज अभिनेत्रींना टाकते मागे, खासच आहे स्टोरी...


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI