Petrol-Diesel Price on 3rd May 2022 : आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूड पुन्हा एकदा प्रति बॅरल 108 डॉलरच्या वर गेलं आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. मंगळवारीही कंपन्यांनी दरात बदल केलेला नाही. तेल कंपन्यांनी 6 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटची वाढ केली होती. त्यानंतर जवळपास महिनाभर दरात कोणताही बदल झालेला नाही.

इंडियन ऑईलनं जारी केलेल्या लेटेस्ट दरांनुसार, राष्ट्रीय राजधानीत एक लिटर पेट्रोलची किंमत (Petrol Price) 105.41 रुपये असून डिझेल (Diesel Price) 96.67 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 120.51 रुपये, तर एक लिटर डिझेलसाठी 104.77 रुपये मोजावे लागत आहेत. 

इंडियन ऑईलनं जारी केलेल्या किमतींनुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलची किंमत 91.45 रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्च नंतर सलग 14 वेळा दरवाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल 10.20 रुपयांनी महाग झालं होतं. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

देशातील महत्त्वाच्या शहरांचे दर काय? 

शहरं  पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 120.51 104.77 
दिल्ली 105.41  96.67
चेन्नई 110.85 100.94 
कोलकाता  115.12 99.83
हैद्राबाद 119.49  105.49 
कोलकाता 115.12  96.83
बंगळुरू  111.09  94.79 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).