International Flight : आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 जानेवारीपर्यंत बंदच राहणार
केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 जानेवारीपर्यंत 2022 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : जगभरात आणि देशात ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता 31 जानेवारीपर्यंत 2022 पर्यंत नियमित आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढता कोरोना प्रसार पाहता पुन्हा ही सेवा सुरु करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. DGCA ने जारी केलेल्या परिपत्रकात याबाबत आदेश दिले आहेत.
इंटरनॅशनल कार्गो संचालन आणि डीजीसीएद्वारे परवानगी दिलेल्या विमानसेवेवर हे लागू होणार नाही. त्याबरोबरच डीसीजीएने सांगितले की, आंतरराष्ट्रीय विमानसेवेतील अधिकाऱ्यांना काही मार्गांसाठी परवानगी देण्याची अनुमती देण्यात आली आहे.
मार्च 2020 पासून स्थगिती
भारत सरकारने 14 देश वगळता इतर सर्व देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा 15 डिसेंबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली होती. परंतु ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव पाहता निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. भारतात कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध लागू करण्यात आले होते. काही महिने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ठप्प होती. त्यानंतर 'वंदे भारत' विमान सेवा आणि कोव्हिड बबल नियमांनुसार, विमानसेवा सुरू करण्यात आली.
भारत सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या
भारत सरकारनंही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ज्या गाईडलाईन्सची अमलबजावणी आजपासून केली जाणार आहे. सुधारित गाईडलाईन्सनुसार, संसर्गाचा धोका असणाऱ्या देशातून आलेल्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही विमानतळावर कोरोना टेस्ट करणं अनिर्वाय असणार आहे. दक्षिण आफ्रिकेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना ज्यांना या व्हेरियंटची लागण झाली आहे त्यांना त्यांच्या स्थानिक वाणिज्य दूतावासांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- Omicronच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क, RTPCR निगेटिव्ह आणि लसीकरण अनिवार्य, हे नियम वाचाच
-
Omicron : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवाशांवर कठोर निर्बंध, सुधारित गाईडलाईन्स जारी