मुंबईः भारतीय नौदलाचा गौरवशाली इतिहास सांगणारी 'आयएनएस विराट' ही युद्धनौका आपल्या शेवटच्या प्रवासाला निघाली आहे. जवळपास 6 दशकं नौदलाची सेवा केल्यानंतर ही युद्धनौका आज मुंबईहून कोच्चीच्या दिशेने रवाना होईल.
कोच्ची येथे 27 तारखेला पोहचल्यानंतर या युद्धनौकेवरच्या महत्वाच्या तोफा, रडार, इंजिन काढल्या जातील. 'आयएनएस विराट'च्या सेवानिवृत्तीनंतर या युद्धनौकेचा संग्रहालयात समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र यावर संरक्षण खात्याने अजून निर्णय दिलेला नाही.
विराट ही युद्धनौका अगोदर ब्रिटनच्या सेवेत होती. त्यानंतर भारताने ही युद्धनौका विकत घेतली. या नौकेला 1987 साली नौदलाच्या ताफ्यात सहभागी करण्यात आलं होतं. भारतीय नौदलाची 6 दशकं सेवा करणारी ही नौका आज अखेरच्या प्रवासाला निघाली आहे.