एक्स्प्लोर

भारतीय नौदलात 'आयएनएस वेला' पाणबुडीचा समावेश; पाकिस्तान-चीनवर राहणार नजर

Indian Navy INS vela भारतीय नौदलात आयएनएस वेला या पाणबुडीचा समावेश करण्यात आला आहे. या पाणबुडीमुळे भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे

INS Vela submarine : स्कॉर्पियन श्रेणीची चौथी पाणबुडी वेलाचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला आहे. आयएनएस वेलाचा समावेश झाल्यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे. यावेळी भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांनी पाकिस्तान आणि चीनच्या हालचालींवर भारताचे लक्ष असल्याचे म्हटले. 

आयएनएस वेला ही चौथी भारतीय पाणबुडी आहे. कोरोना महासाथीमुळे काही अडचणी समोर आल्या होत्या. मात्र, त्यावर मात करण्याचा प्रयत्न झाल्याचे अॅडमिरल करमबीर सिंग यांनी म्हटले. आयएनएस वेलामुळे भारतीय नौदलाच्या ताकदीत वाढ झाली आहे. आजची गतिमान आणि गुंतागुंतीची सुरक्षा परिस्थिती पाहता, भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी नौदलाची क्षमता वाढवण्यात आयएनएस वेला मोठी भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

नौदल प्रमुख म्हणून मी सर्वांचे आभार मानतो. माझ्या कार्यकाळात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि कोरोनाचे मोठे आव्हान होते. त्यानंतरही आम्ही दुसऱ्या देशांमधून लिक्विड ऑक्सिजन आणले.  त्याशिवाय त्यांना मदतही केली. आम्ही चीन आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या परस्पर सहकार्यावरही आमचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रोजेक्ट 75 अंतर्गत 6 पाणबुड्यांची निर्मिती

प्रोजेक्ट 75 अंतर्गत सहा पाणबुड्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. यातील तीन पाणबुड्या याआधीच भारतीय नौदलात रुजू झाल्या आहेत. आज चौथी पाणबुडी दाखल झाली आहे. आयएनएस वेलामध्ये अॅडवान्स एकॉस्टिक सायलेन्सिंग तंत्रज्ञान आहे. रेडिएटिड नॉइस लेव्हलही कमी आहे. पाणबुडी ही हायड्रो-डायनामिक आहे. लक्ष्याचा अचूक निशाणा साधण्यासह शत्रूला मोठा धक्का देण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे. 

आयएनएस विशाखापट्टणम युद्धनौकेचा समावेश 

स्वदेशी बनावटीची आयएनएस विशाखापट्टणम या अत्याधुनिक युद्धनौकेचा रविवारी भारतीय नौदलात समावेश करण्यात आला आहे.विशाखापट्टणम' ही विनाशिका माझगाव डॉकने तयार केली आहे. 
बराक, ब्राम्होस, अॅन्टी सबमरिन, रॉकेट लॉन्चर अशा अनेक सुविधांनी सुसज्ज असलेल्या आएनएस विशाखापट्टणममुळे शत्रूच्या उरात धडकी भरणार आहे. विशाखापट्टणमचे वजन तब्बल साडेसात हजार टन इतकं आहे आणि त्याची लांबी 164 मीटर इतकी आहे. कुठल्याही रडारमध्ये सहज टिपली जाणार नाही, हे 'विशाखापट्टणम'चे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Belgium PM Bart De Wever in India: बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
Rooftop Solar: भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
Nepal Floods Marathi News: नेपाळच्या महाप्रलयात आतापर्यंत 1 हजार 344 जणांचा मृत्यू, 275 भारतीय अजूनही बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाकडून महत्त्वाची माहिती
नेपाळच्या महाप्रलयात आतापर्यंत 1 हजार 344 जणांचा मृत्यू, 275 भारतीय अजूनही बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाकडून महत्त्वाची माहिती

व्हिडीओ

Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
iPhone 18 Pro Camera : iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
Dahi Handi 2026: मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप
Dahi Handi 2026: मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप
Belgium PM Bart De Wever in India: बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
Rooftop Solar: भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
Divija Fadanvis Video: देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
Beed Well News: निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडी ठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडीठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
Embed widget