INS Vagir : भारतीय नौदलाला (Indian Navy) लवकरच आणखी एक पाणबुडी मिळणार असून त्यामुळे नौदलाची ताकद वाढणार आहे. 'प्रोजेक्ट 75' (Project 75) अंतर्गत आतापर्यंत चार पाणबुड्या नौदलात सामील करण्यात आल्या आहेत, तर पाचवी पाणबुडी येत्या काही महिन्यांत सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर नौदलात सामील करण्यात येणार आहे. भारतीय नौदलाने बुधवारी सांगितले की 'प्रोजेक्ट 75' च्या पाचव्या पाणबुडीच्या समुद्री चाचण्या सुरू झाल्या आहेत. या अंतर्गत प्रोपल्शन सिस्टीम, शस्त्रे आणि संवेदी उपकरणांची चाचणी घेतली जाईल.


अधिकृत निवेदनानुसार, या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या वर्षाच्या अखेरीस भारतीय नौदलात पाणबुडी सामील करण्यात येणार आहे. नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर ही पाणबुडी 'आयएनएस वागीर' (INS Vagir) या नावाने ओळखली जाईल. नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की, "प्रोजेक्ट 75, यार्ड 11879, भारतीय नौदलाच्या पाचव्या कलावरी श्रेणीतील पाणबुडीने 1 फेब्रुवारीपासून सागरी चाचण्या सुरू केल्या. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) च्या कान्होजी आंग्रे वेट बेसिनमधून नोव्हेंबर 2020 मध्ये पाणबुडीचे बांधकाम सुरू करण्यात आले. ताफ्यात सामील झाल्यानंतर त्याला 'वागीर' असे नाव दिले जाईल.


नौदलाने म्हटले आहे की, कोरोना महामारी असूनही, मुंबईस्थित MDL ने 2021 मध्ये 'प्रोजेक्ट 75' मधील दोन पाणबुड्यांचा पुरवल्या असून पाचव्या पाणबुडीच्या समुद्री चाचण्यांना सुरुवात हा एक मैलाचा दगड आहे. निवेदनात म्हटले आहे की, "पाणबुडीला समुद्रातील तिच्या सर्व यंत्रणा जसे की प्रणोदन प्रणाली, शस्त्रे आणि संवेदना उपकरणांची सखोल तपासणी केली जाईल. या चाचण्या पूर्ण झाल्यावर २०२२ मध्येच ही पाणबुडी भारतीय नौदलाला पुरवण्याची योजना आहे."


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha