एक्स्प्लोर
Advertisement
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शाईफेक
बिकानेक (राजस्थान) : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर शाईफेकी झाली. राजस्थानमधील बिकानेर शहरात ही घटना घडली.
या प्रकरण दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ते अभाविपचा नेते असून दिनेश ओझा असं एकाचं नाव असल्याचं कळतं.
भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकवर दिलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांच्यावर शाई फेकण्यात आली.
अरविंद केजरीवाल एका कार्यक्रमासाठी राजस्थानच्या बिकानेरमध्ये गेले होते. केजरीवाल कारमध्ये बसण्याआधी लोकांना अभिवादन करणार, इतक्यात अभाविपच्या एका कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली. त्यांच्या चेहरा आणि कपड्यांवर शाईचे शिंतोडे उडाले.
शाईफेकीच्या घटनेनंतर अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिलं आहे की, माझ्यावर शाई फेकणाऱ्यांवर देव कृपा करो, त्यांचं भलं होवो, अशी मी प्रार्थना करतो.
याशिवाय बिकानेरच्या नोखामध्ये केजरीवालांना काळे झेंडे दाखवणाऱ्या बजरंग दलाचा नेता बजरंग पालीवाल यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement