नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील इंदूर शहर सलग चौथ्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर गुजरातमधील सूरत शहर आहे. स्वच्छता सर्वेक्षण 2020 मध्ये एक लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या कॅटगरीमध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूरची निवड करण्यात आली आहे. तर दुसऱ्या स्थानी गुजरातमधील सूरत शहराची निवड करण्यात आली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील नवी मुंबई शहर सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवडण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छ सर्वेक्षण
2020'मध्ये परिणामांची घोषणा केली. या दरम्यान स्वच्छतेसाठी उत्तम उपाययोजना करणाऱ्या शहरांचाही गौरव करण्यात आला आहे.


मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यांसंदर्भात बोलताना सांगितले की, स्वच्छता इंदूरचा स्वभावच आहे. इंदूरच्या जनतेने अस्वच्छेतेला पळवून लावलं आहे आणि स्वच्छता इंदूरची सभ्यता बनली आहे. मी इंदूरच्या जनतेला शुभेच्छा देतो. आता केवळ देशातीलच नाही तर जगभरातील लोक स्वच्छतेची शिकवण घेण्यासाठी कुठे येत असतील तर इंदूरमध्येच येतील.'


पाहा व्हिडीओ : देशात स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबई तिसऱ्या स्थानी, इंदूर पहिल्या स्थानी



वाराणसी बेस्ट गंगा टाऊन


देशातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात करण्यात आली. गेल्या 28 दिवसांत स्वच्छ सर्वेक्षण 2020 पूर्ण करण्यात आलं आहे. गुरुवारी आयोजित करण्यात येणाऱ्या स्वच्छ महोत्सवामध्ये स्वच्छता सर्वेक्षण रिपोर्टव्यतिरिक्त स्वच्छ सर्वेक्षण इनोवेशन, स्वच्छ सर्वेक्षण सोशल मीडिया आणि गंगा किनाऱ्यावर वसलेल्या शहरांचेही रिपोर्ट शेअर करण्यात आले. यामध्ये वाराणसी शहराला बेस्ट गंगा टाऊन हा किताब देण्यात आला.


इंदूरला सलग चौथ्यांदा सर्वात स्वच्छ शहराचा किताब


स्वच्छता सर्वेक्षणाच्या पहिल्या आवृत्तीत म्हैसूरला भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळाला होता. त्यानंतर सलग तीन वर्ष 2017, 2018 आणि 2019मध्ये मध्यप्रदेशातील इंदूर शहराला सर्वात स्वच्छ शहराचा मान देण्यात आला होता. तसेच यावर्षीही सलग चौथ्यांदा इंदूरने हा मान पटकावला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Atal Rankings ARIIA 2020: अटल रँकिंग जाहीर; आयआयटी मद्रास अव्वल स्थानी


सरकारी नोकरींसाठी आता देशभरात एकच सामायिक परीक्षा होणार! मोदी सरकारचा निर्णय


मध्य प्रदेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये केवळ भूमिपुत्रांनाच स्थान : मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान