नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज नाविन्यपूर्ण कृती (एआरआयआयए) 2020 च्या अटल रँकिंगची घोषणा केली. आयआयटी मद्रासने राष्ट्रीय महत्त्व संस्था, केंद्रीय विद्यापीठे आणि केंद्रीय अनुदानीत तांत्रिक संस्थांच्या प्रकारात अव्वल स्थान मिळवले.
केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री रामेश पोखरीयल निशंक आणि संजय शामराव धोत्रे हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सचिव (उच्च शिक्षण), एआयसीटीईचे अध्यक्ष अमित खरे, एआरआयए मूल्यांकन समितीचे अध्यक्ष प्रो. अनिल सहस्रबुद्धे, डॉ. बीव्हीआर मोहन रेड्डी आणि मुख्य मंत्रालयीन शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलचे डॉ. अभय जेरे उपस्थित होते.
यात राज्यपातळीवर पुण्याचे सीओईपी पहिल्या क्रमांकावर नांदेडचे गुरूगोविंदसिंह महाविद्यालय चौथ्या आणि मुंबईचे व्हिजीटीआय पाचव्या क्रमांकांवर आले आहे. आयआयटी मुंबईचा आयआयटी रॅकिंग मध्ये दुसरा क्रमांक आहे.
यावर्षी, एआरआयआयएच्या घोषणेमध्ये संस्थांचे दोन विस्तृत श्रेणी आणि सहा उप श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले. यापैकी आयआयटी मद्रासने राष्ट्रीय महत्त्व संस्था, केंद्रीय विद्यापीठे आणि केंद्रीय अनुदानीत तांत्रिक संस्थांच्या प्रकारात अव्वल स्थान मिळवले. रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई यांना शासकीय व शासकीय सहाय्यित विद्यापीठांतर्गत अव्वल स्थान मिळाले. शासकीय व शासकीय सहाय्यित महाविद्यालये अंतर्गत पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय; कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी, खासगी किंवा सेल्फ-फायनान्स युनिव्हर्सिटीअंतर्गत भुवनेश्वर आणि खासगी किंवा सेल्फ-फायनान्स कॉलेजेस अंतर्गत वारंगल एस आर अभियांत्रिकी महाविद्यालय अनुक्रमे अव्वल पदांवर घोषित झाले. यावेळी उपराष्ट्रपतींनी एआरआयआयए 2021 सुरू करण्याची घोषणा केली आणि संस्थांना रँकिंगमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.