Indigo Flight : इंदुर ते हैदराबाद दरम्यान जाणाऱ्या फ्लाईटमध्ये एका प्रवाशाने चांगलाच दंगा केलाय. भांग पिऊन विमानात शिरला आणि इमर्जन्सी दरवाजे उघडू लागल्याचा आरोप एका प्रवाशावर करण्यात आालय. या प्रकरणी आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात बसण्यापूर्वी प्रवाशाने भांग पिली होती. त्यानंतर त्या प्रवाशाने कर्मचाऱ्यांशी देखील हुज्जत घातली आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना 21 मे रोजी घडली आहे.
प्रवाशाला गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले
अधिकची माहिती अशी की, इंडिगो इअरलाईन्सकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, इंदुरहून हैदराबादमध्ये जात असलेल्या फ्लाईटमध्ये 21 मे रोजी एका प्रवाशाने ईमर्जन्सी दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टिमनुसार, प्रवाशाला गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर विमानाने लँडिग करताच त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणताही हलगर्जीपण सहन केला जाणार नाही, हे कंपनीने स्पष्ट केलं आहे.
गैरव्यवहार करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला दुसऱ्या जागेवर बसवण्यात आले
सूत्रांच्या माहितीनुसार, इंदुर ते हैदराबाद जाणारी ही फ्लाईट होती. व्यक्ती सर्वांशी गैरव्यवहार करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला दुसऱ्या जागेवर बसवण्यात आले. मात्र, थोड्यावेळाने त्याने तीर्थयात्रेसाठी आलेल्या त्याच्या मित्रांजवळ बसण्याचा हट्ट सुरु केला. मात्र, इतरांनी समजूत काढल्यानंतर तो शांत झाला. पण त्याने दंगा केलाच.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे इंस्पेक्टर बालाराजू यांच्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण केले तेव्हा तो कारण नसताना संपूर्ण विमानात फिरत होता. जेव्हा वैमानिक फ्लाईट लँड करण्याच्या तयारीत होते, तेव्हा तो इमर्जन्सी दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे कृत्य पाहून लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. अनिल पाटील असे आरोपीचे नाव असून तो उज्जैन येथे महादेवाच्या दर्शनासाठी गेला होता.
इतर महत्वाच्या बातम्या