एक्स्प्लोर

भारतात कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली, 24 तासात 74 हजार जण कोरोनामुक्त

देशात कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये घट होऊन आता ही संख्या सात लाखांपेक्षा कमी झाली आहे. काल दिवसभरात 73 हजार 979 रुग्ण बरे होऊन घरी परतले.

नवी दिल्ली : भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे पण त्याच्या 20 टक्के वेगाने कोरोना रुग्ण बरे देखील होत आहेत. देशात कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये घट होऊन आता ही संख्या सात लाखांपेक्षा कमी झाली आहे. आतापर्यंत 10 कोटी लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा एकूण पॉझिटिव्हिटी रेट 7.81 टक्के आहे आणि दररोजचा पॉझिटिव्हिटी रेट 3.8 टक्के आहे. अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा पॉझिटिव्हिटी रेट राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासात 54 हजार 366 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 690 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर दिवसभरात 73 हजार 979 रुग्ण बरे होऊन घरी परतले. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 77 लाख 61 हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी एक लाख 17 हजार 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 69 लाख 49 हजार जण आतापर्यंत बरे झाले आहे. शिवाय अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन 6 लाख 95 हजारांवर आली आहे.

अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या नऊ पट कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या नऊ पट आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये कोरोना व्हायरसचे अॅक्टिव रुग्ण, मृत्यू दर आणि रिकव्हरी रेटची टक्केवारी सर्वाधिक आहे. ICMR च्या माहितीनुसार, 22 ऑक्टोबरपर्यंत कोरोना व्हायरसचे एकूल 10 कोटी नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 14 लाख नमुन्यांची तपासणी काल झाली आहे. पॉझिटिव्हिटी रेट चार टक्क्यांपेक्षा कमी आहे.

सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात देशाच्या 22 राज्यं/ केंद्र शासित प्रदेशांमध्ये 20,000 पेक्षा कमी कमी अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यात 50 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्णांची नोंदी होत आहे. सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. कोरोनाबाधितांच्या बाबतील भारत जगातील दुसरा सर्वाधिक प्रभावित देश आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीत अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारताचा नंबर आहे.

दिलासादायक बाबत म्हणजे मृत्यू दर आणि अॅक्टिव रुग्णांच्या दरास सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. मृत्यू दर कमी होऊन 1.51 टक्क्यांवर आला आहे. याशिवाय ज्या अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत त्यांचा दरही 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. यासोबतच रिकव्हरी रेट म्हणजे बरं होण्याचा दर 89 टक्के आहे. भारतात रिकव्हरी रेट सतत वाढत आहे.

#Corona हळूहळू गायब होतोय? कोरोनाचा अंत जवळ आलाय? रुग्णसंख्या कमी होण्यामागचं सत्य नेमकं काय आहे?

महत्त्वाच्या बातम्या

मोर्चात सहभागी न होता बर्गर खायला गेले, कॉकरोच जनता पार्टीकडून विजेता दहियांवर कारवाई, प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी 
मोर्चात सहभागी न होता बर्गर खायला गेले, कॉकरोच जनता पार्टीकडून विजेता दहियांवर कारवाई, प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी 
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
Delhi Protest : पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरून राहुल गांधींना उचललं, प्रियंका गांधींचा जोरदार प्रतिक्रार; काँग्रेसचे अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात
पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरून राहुल गांधींना उचललं, प्रियंका गांधींचा जोरदार प्रतिक्रार; काँग्रेसचे अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
Embed widget