Russia Ukraine Crisis : रशिया-युक्रेन युद्धात भारतीयांना दिलासा, व्हिसाशिवाय पोलंडची सीमा पार करता येणार
Russia Ukraine Crisis : रशिया-युक्रेन युद्धात भारतीयांसाठी दिलासादायक बातमी आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना आता व्हिसाशिवाय पोलंडची सीमा पार करता येणार आहे.
Russia Ukraine Crisis : गेल्या पाच दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाकडून होत असलेल्या सततच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत बिटक झाली आहे. हजारो भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. आतापर्यंत सहा विमाने भारतीयांना घेऊन मायदेशी परतली आहेत. परंतु, अद्यापही अजून अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू असतानाच युक्रेनमधील भारतीयांना दिलासा मिळाला आहे. युक्रेनमधील भारतीयांना व्हिसाशिवाय पोलंडची सीमा पार करता येणार आहे. भारतातील पोलंडच्या राजदूतांनी याबाबतची माहिती दिली आहे.
There will be special flights for Indian students. Poland is cooperating & will also help India's High-level delegation in evacuation process. Indian nationals can cross into Poland border without any visa: Ambassador of Poland to India, Adam Burakowski on #RussiaUkraineConflict pic.twitter.com/uCeCeG8vJz
— ANI (@ANI) February 28, 2022
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना पोलंड, हंगेरी आणि रोमानियामध्ये रस्त्याने आणले जात आहे आणि तेथून त्यांना भारतात पाठवले जात आहे. त्यामुळे युक्रेनमधून पोलंडमध्ये प्रवेश करणाऱ्या भारतीयांना आता व्हिसाची आवश्यकता भासणार नाही. याबाबत माहिती देताना भारतातील पोलंडचे राजदूत अॅडम बुराकोव्स्की म्हणाले, भारतीय विद्यार्थ्यांसह सुमारे दोन लाख लोक सीमा ओलांडून पोलंडमध्ये गेले आहेत. सीमेवर खूप गर्दी आहे पण आम्ही सर्वांचे स्वागत करत आहोत.
राजदूत अॅडम बुराकोव्स्की म्हणाले, भारतीय विद्यार्थ्यांसाठी विशेष विमाने असतील. शिवाय पोलंड भारताला संपूर्ण मदत करत आहे. व्हिसाशिवाय या विद्यार्थ्यांना युक्रेनमधून पोलंडमध्ये येता येणार आहे. आम्ही युक्रेनचे समर्थन करत असून युक्रेनला मदत करण्यासह त्यांना शस्त्रांचा पुरवठा देखील करणार आहोत. संपूर्ण युरोपियन युनियनचे हवाई क्षेत्र खासगी विमानांसह रशियन विमानांसाठी बंद आहे. जपान, अमेरिका आणि इतर देशांनी रशियावर निर्बंध घातले आहेत.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. दोन्ही देशांमधील युद्ध थांबणार की नाही? याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. आज बेलारूसमध्ये रशिया-युक्रेन यांच्यात चर्चा होणार आहे. दोन्ही देशांची शिष्टमंडळं बेलारूसमध्ये पोहोचली असून चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine War : चर्चेपूर्वी रशियाने युद्धविराम जाहीर करावा ; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मागणी
- कॉमेडियन ते राष्ट्राध्यक्ष! आता हा पठ्ठ्या थेट पुतिन यांना भिडतोय अन् नडतोय... जाणून घ्या कसा आहे व्होदिमर झेलेन्स्की यांचा प्रवास
- Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन वादावर केवळ संवादातून मार्ग निघेल; पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेत मोदींचे आवाहन
- Russia-Ukraine: थोडा जरी आत्मसन्मान शिल्लक असेल तर इम्रान खाननी रशिया दौरा रद्द करावा: शशी थरूर