Indian Railways Latest News : महिलांसाठी भारतीय रेल्वेनं मोठी घोषणा केली आहे.  लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाडीमध्ये बोगीमध्ये महिलांसाठी सहा जागा यापुढे राखीव ठेवण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची घोषणा केली आहे. याशिवाय रेल्वेमध्ये महिला प्रवाशांना आणखी काही सुविधा मिळणार आहेत. रेल्वेच्या या निर्णायामुळे महिलांना तिकिट आरक्षित करताना फायदा होणार आहे. त्याशिवाय इतर सुविधांमुळे प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. 


सुरक्षेसाठी प्लान तयार -
लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये भारतीय रेल्लेनं Indian Railways) महिलांसाठी काही बर्थ आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच महिलांच्या सुरक्षेसाठी खास प्लॅनही तयार करण्यात येणार आहे.  केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) म्हणाले की, लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये महिलांना आरामदायी प्रवास करताना यावा यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railways) बर्थ रिझर्व करण्यासोबत आणखी सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी खास उपाय योजना करण्यात येणार आहेत. 


स्लीपर क्लास बोगीमध्ये सहा बर्थ आरक्षित -
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनमध्ये (Mail and Express Trains)स्लीपर क्लास कोचमध्ये सहा बर्थ महिलांसाठी राखीव असतील.  गरीब रथ (Garib Rath), राजधानी (Rajdhani), दुरंतोसह वातानुकूलित एक्स्प्रेस ट्रेनच्या थर्ड एसी कोचमध्ये (3AC class) महिला प्रवाशांसाठी (Female Passengers)   सहा बर्थ राखीव असतील.   


45 वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांसाठी आरक्षण
प्रत्येक स्लीपर कोचमध्ये सहा सात सात लोअर बर्थ (Lower Berths), वातानुकूलित 3 टियर (3 एसी) कोचमध्ये चार ते पाच लोअर बर्थ आणि वातानुकूलित 2 टियर (2 एसी) कोचमध्ये तीन ते चार लोअर बर्थ वरिष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizens), 45 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला प्रवाशांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी (Pregnant Women) आरक्षित असतील. ट्रेन, मेल अथवा एक्स्प्रेसमधील बोगीच्या संख्येच्या आधारावर महिलांसाठीचे बर्थची संख्या ठरवली जाईल.  


रेल्वे मंत्री म्हणाले की, ट्रेनमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी (Women Passengers Safety) विशेष  व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय संविधानाच्या सातव्या कलमानुसार पोलीस आणि सार्वजनिक सुव्यवस्था हे राज्याचे विषय आहेत. पण आरपीएफ, जीआरपी आणि जिल्हा पोलिस प्रवाशांसाठी चांगली सुरक्षा देतील. 


त्यासोबतच रेल्वेमध्ये आणि रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांसोबत इतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जीआरपीच्या (GRP)मदतीनं रेल्वे सुरक्षेची विषय सोय करत आहे. आरपीएफने मागील वर्षी 'मेरी सहेली' (Meri Saheli) या उपक्रमाची सुरुवात केली होती. रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना पूर्णपणे सुरक्षा देणं, हा या उपक्रमाचा उद्देश होता, असे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.