Foreign portfolio investment : जवळपास दोन महिने सतत विक्री केल्यानंतर परदेशी गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात खरेदीदार बनले आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या चार दिवसांत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात सुमारे 15,280 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरी ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंगचा मागोवा घेणाऱ्या फर्मने अलीकडेच ही आकडेवारी जारी केली आहे.


ऑगस्टमध्ये 51,200 कोटी रुपयांची गुंतवणूक


जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 1 ते 4 नोव्हेंबर दरम्यान विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 15,280 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी 8 कोटी रुपयांची विक्री केली होती, तर सप्टेंबरमध्ये 7,624 कोटी रुपयांची विक्री झाली होती. त्याचवेळी ऑगस्ट महिन्यात भारतीय बाजारपेठेत एफपीआयच्या माध्यमातून 51,200 कोटी रुपये आणि जुलैमध्ये 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.


फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.75% वाढ


एफपीआयमध्ये ही वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा सेंट्रल बँक ऑफ अमेरिकाने व्याजदरात 0.75% वाढ केली आहे. परकीय गुंतवणूकदार या अपेक्षेने बाजारात गुंतवणूक करत आहेत की व्याजदर वाढ आता अंतिम टप्प्यात आहे आणि आगामी काळात आणखी वाढ होण्याची शक्यता कमी आहे अशी माहिती असोसिएट डायरेक्टर आणि मॅनेजर रिसर्च, मॉर्निंग स्टार इंडियाचे हिमांशू श्रीवास्तव दिली आहे


FPI मध्ये चढ-उतार होत राहतील


एफपीआयमध्ये अस्थिरता कायम राहण्याची भीती कोटक सिक्युरिटीजच्या इक्विटी रिसर्चचे प्रमुख श्रीकांत चौहान यांनी व्यक्त केली आहे. चौहान यांच्या म्हणण्यानुसार व्याजदरात झालेली वाढ आणि भू-राजकीय परिस्थितीतील बदलामुळे FPIs द्वारे गुंतवणुकीत आणखी चढ-उतार होऊ शकतात.


परदेशी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला


यूएस बॉन्ड उत्पन्न आणि डॉलर मजबूत होत असतानाही भारतीय बाजारपेठेत एफपीआयची वाढ हे खूप चांगले लक्षण आहे. यावरून भारतीय अर्थव्यवस्थेवर एफपीआयचा विश्वास दिसून येतो आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात एफपीआयय भारतीय शेअर बाजारात शानदार पुनरागमन करतील अशी अपेक्षा आहे. येत्या काही दिवसांत फेडरल रिझर्व्हच्या बाजूने काही प्रमाणात नरमाई येईल अशी अपेक्षा जाणकारांनी व्यक्त केली आहे.


ही बातमी देखील वाचा


हलाखीच्या परिस्थितीवर मात करत मिळवली सव्वा कोटींची शिष्यवृत्ती, वाशिमच्या शेतकरीपुत्राची कमाल