LAC Infrastructure Development : चीनला (China) थोपवण्यासाठी भारताने (India) सीमाभागातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) तवांगमध्ये (Tawang) भारत आणि चीनमध्ये (India-China Faceoff) काही दिवसांपूर्वी संघर्ष झाला. भारतीय हद्दीत चीनचा (India-China Dispute) घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैन्याने उलथून लावला. यामुळे सध्या चीन आणि भारत यांच्यात सीमेवर तणाव पाहायला मिळत आहे. एकीकडून चीन सीमावर्ती भागात हालचाली कायम आहे. या पार्श्वभूमीवर भारत सीमेलगतच्या भागात पायाभूत सुविधा अधिक मजबूत करत आहे. सीमावर्ती भागात भारत सरकारकडून रस्ते आणि भूयारांचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. 





दरम्यान, भारत सरकारने सीमेवर पायाभूत सुविधांच्या उभारणीला गती दिली आहे. भारत सीमावर्ती भागात रस्ते बांधण्याचं काम वेगाने सुरु आहे. अरुणाचल प्रदेशात 5,700 फूट उंचीवर नेचिफू बोगद्याचे बांधकाम सुरू आहे. सेला पास बोगदा तवांगजवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेकडे (LAC) बांधला जात आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) सीमावर्ती भागात नवीन रस्ते बांधण्यात गुंतलेली आहे. यासोबतच अरुणाचल प्रदेशातील सर्व सीमावर्ती गावे चांगल्या रस्त्याने एकमेकांशी जोडण्याची योजना सरकारने आखली आहे. 






सरकार BRO वर्तक प्रकल्पाअंतर्गत अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील विकास कामांकडे भर दिली जात आहे. या भागातील पायाभूत सुविधा लवकरात लवकर सुधारण्याची सरकारची योजना आहे. रस्ते संपर्क मजबूत करण्याकडे सरकारचा कल आहे. भारत आपल्या दशकांपूर्वीच्या जुन्या धोरणापासून मागे हटून सीमाभागात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांवर भर देत आहे.


नेचिफू बोगद्याचे काम वेगाने सुरू


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेलगत 5700 फूट उंचीवर नेचिफू बोगद्याचे बांधकाम वेगाने सुरू आहे. डी-आकारात बनवलेला हा सिंगल-ट्यूब डबल-लेन बोगदा दुतर्फा वाहतुकीसाठी वापरण्यात येईल. याशिवाय, अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेकडे (LAC) BRO कडून सेला पास बोगदा बांधला जात आहे. यामुळे भारतीय लष्कराला सर्व प्रकारच्या हवामानामध्ये संपर्क साधण्यास मदत होईल. 13,000 फूट उंचीवर सेला पास बोगदा बांधला जात आहे. सेला पास बोगद्याचे कामही येत्या पाच ते सहा महिन्यांमध्ये पूर्ण होईल.


नेचिफू बोगदा बांधण्याचं कारण काय?


नेचिफू बोगदा बांधण्यात येत असलेल्या परिसरात दाट धुके आहे, त्यामुळे स्थानिक वाहने आणि लष्कराच्या वाहनांही ये-जा करणे कठीण होतं. त्यामुळे नेचिफू बोगदा फार महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या भारतीय लष्कराचे जवान आणि परिसरातील लोक तवांगला जाण्यासाठी बलीपारा-चरिदुवार रस्त्याचा वापर करतात. थंडीच्या मोसमात जास्त बर्फवृष्टी झाल्यामुळे, हिवाळ्यात सेला पास मार्गावरील संपर्क साधण्यात अडचण निर्माण होतो. याशिवाय वाहतुकीवरही मर्यादा येतात.