एक्स्प्लोर

'अब की बार, मंदी लाई सरकार', असं का म्हटलं जातंय?

भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरुन मोदी सरकारला चौफेर घेरलं आहे. त्यामुळे 'अबकी बार, मंदी लाई सरकार' असं म्हटलं जात आहे.

नवी दिल्ली : मंदीच्या काळात नोटाबंदी म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं असल्याचा घणाघात भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हांनी केला. आर्थिक मंदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्याच पक्षातून घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे 'अबकी बार, मंदी लाई सरकार' असं का म्हटलं जात आहे, असा सवाल प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. विकास दराबाबतीत विविध कंपन्यांचा अंदाज विकास दर घसरल्यामुळे सरकार निशाण्यावर आलं आहे. विकास दराचा अंदाज बांधणाऱ्या जगभरातील विविध संस्थांच्या मते, भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती बिघडलेली आहे. 2017-18 या वर्षासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेने विकास दर 7.4 टक्क्यांहून 7 टक्के केला आहे. तर क्रायसिलनेही विकास दर 7.4 टक्क्यांहून 7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला. ग्लोबल ब्रोकरेज कंपनी यूबीएसनुसार, भारताचा विकास दर 7.2 टक्क्यांहून 6.6 टक्क्यांवर येणार आहे. पेट्रोलच्या किंमतीत वाढ सरकारविरोधातील रोष वाढण्यामागे पेट्रोल आणि डिझेलच्या भडकलेल्या किंमती हे एक महत्त्वाचं कारण आहे. जगभरात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे, तर दुसरीकडे भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भडकल्या आहेत. दिल्लीत जून 2014 मध्ये पेट्रोलचे दर 71.51 रुपये प्रती लिटर होते. तर सध्या 70.41 रुपये प्रती लिटर आहेत. हा फरक तुम्हाला किरकोळ दिसेल, मात्र 2014 मध्ये कच्च्या तेलाचे दर 6 हजार 750 रुपये प्रती बॅरल होते, तर आता 3200 रुपये प्रती बॅरल आहेत. म्हणजे कच्च्या तेलाची किंमत निम्म्याहून अधिक कमी होऊनही सरकारने कर वाढवून पेट्रोलची किंमत तेवढीच ठेवली आहे. यूपीए सरकारच्या काळात पेट्रोलवर एक्साईज ड्युटी 9 रुपये 48 पैसे होती. तर एनडीए सरकारच्या काळात एक्साईज ड्युटी 21 रुपये 48 पैसे आहे. मोदी सरकारच्या काळात एक्साईज ड्युटी 9 वेळा वाढली आहे. बेरोजगारी मोठी समस्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वर्षाला एक कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र हे आश्वासन हवेतचं विरलं आहे.
  • 2014 साली 2 लाख 75 हजार नोकऱ्या देण्यात आल्या
  • 2015 मध्ये 1 लाख 35 हजार नोकऱ्या देण्यात आल्या
  • 2016 मध्ये 2 लाख 31 हजार नोकऱ्या देण्यात आल्या
म्हणजे मोदी सरकारच्या कार्यकाळात आतापर्यंत एकूण 6 लाख 41 हजार नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सव्वाशे कोटींची लोकसंख्या असणाऱ्या या देशात बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या बनली आहे.

संबंधित बातमी : मंदीत नोटाबंदी म्हणजे आगीत तेल : यशवंत सिन्हा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Miss Universe India 2026: केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Brydon Carse Night Club VIDEO : नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
Amravati Hospital Fire baby death: अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन नवजात बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
Miss Universe India 2026: केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
IND vs SL 2nd TEST Day-2 LIVE : पडिक्कलने पाया रचला, आता पंत अन् जुरेल घालणार धुमाकूळ... दुसऱ्या दिवशीचा खेळ किती वाजता होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट
पडिक्कलने पाया रचला, आता पंत अन् जुरेल घालणार धुमाकूळ... दुसऱ्या दिवशीचा खेळ किती वाजता होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Nagpur Chlorine Gas Leaks: नागपूरच्या गोधनी परिसरात क्लोरिन गॅसची गळती; 40हुन अधिक स्थानिकांना मळमळ अन् उलट्यांचा त्रास, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु
नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरात क्लोरिन गॅसची गळती; 40हुन अधिक स्थानिकांना मळमळ अन् उलट्यांचा त्रास, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु
Amravati Fire baby death: नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
Embed widget