भारतात 5, 10, 20, 50 आणि शंभरसह सर्वच नोटा जीवाणू बाधित आहेत.
दुनिया पैशांवर चालते आणि पैशांची भाषा बोलते म्हणतात.. पैशाशिवाय तुमचं पानही हलत नाही. जिथे जाल तिथे हातात नोटा खेळवाव्याच लागतात.
बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी - - पैसे मोजा, पेट्रोल, डिझेल भराचयं - पैसे मोजा, साधी पाणीपुरी खाल्ली तरी पैसे मोजावे लागतात आणि एटीएम मधून आलेले - पैसेही मोजायचेच असतात.
रोज कित्येक वेळा आपण अशाप्रकारे पैशाच्या नोटा हाताळत असतो. मात्र थोडं थांबा. कारण याच नोटा तुमच्या जिवावर उठू शकतात. हा आमचा नाही तर फूड सेफ्टी अँड स्टँटर्ड अथॉरिटी ऑफ इंडियांचा दावा आहे.
इंटरनॅशनल जर्नल ऑफ डेंटल क्लिनीकने भारतात 5, 10, 50 आणि 100 च्या नोटा गोळा केल्या. भाजी मार्केट, दूध डेअरी, बँक, पेट्रोल पंप अशा ठिकाणांवरुन या नोटा जमा करण्यात आल्या होत्या. ज्यावेळी या नोटांवर रिर्सच करण्यात आलं त्यावेळेस समजलं की या सर्वच्या सर्व नोटा जीवाणूंनी बाधित होत्या.
या बाधित नोटा सामान्यांच्या संपर्कात आल्याने विविध आजारांशी गाठ अगदी साहजिक आहे.
नोटांवर असतात जीवघेणे जिवाणू
नोटांवर पाच प्रकारांचे जीवाणू आढळतात
- ई कोलाई
- स्टेफाइलोकोकस
- स्लमोनेला एंट्रीटाइडिस
- स्ट्रेप्टोफोकस
- प्रोटियस असे जीवाणू असतात
या जीवाणूंमुळे प्रतिकारक क्षमता कमी होते.
FSSAI ने नोटांमुळे आजारी पडण्याचा केलेला दावा खरा आहे. या बाधित नोटा लोकांच्या संपर्कात आल्याने गंभीर आजार होत आहेत. या जिवाणूंचा सर्वात जास्त धोका लहान मुलं, महिला आणि वृद्धांना होतो.
कोणत्याही स्वरुपात नोटांच्या संपर्कात आल्याने जीवाणू आपल्या खाण्या-पिण्याद्वारे आपल्या पोटात जातात. त्यामुळे आजारी पडण्याची धोका आणखी बळावतो. त्यामुळे नोटांना स्पर्श केल्यानंतर व्यवस्थित हात धुणे गरजेचे आहे.
हा धोका टाळण्यासाठी खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांनी स्वच्छतेचं काटेकोर पालन करण्याची गरज आहे. तसंच हातमोज्यांचा वापरही अनिवार्य करण्याची गरज आहे. अन्यथा गाठ आजारांशी आहे. तेव्हा पैसे हाताळताना जरा जपून.