Indian Army Soldiers Video : गेल्या एक-दोन महिन्यांत भारतीय लष्करातील जवानांचे (Indian Army Soldier)असे अनेक व्हिडिओ समोर आले होते, जे पाहिल्यानंतर संपूर्ण जग थक्क झाले होते. बर्फाच्छादित डोंगराळ भागात नीचांकी तापमानात देशाचे संरक्षण करत असलेले हे सैनिक तेव्हा कसरत करताना दिसत होते, तर काही सैनिक बर्फाच्या वादळातही जोमाने कर्तव्य बजावत होते. जवानांचे असे व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या मनात लष्कराबद्दलचा आदर आणखीनच वाढला. तसेच लष्कराचे जवान बर्फाळ मैदानातही व्हॉलीबॉल खेळताना दिसले. अशा विविध खेळांनी जवानांचे मनोरंजन होते आणि त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सर्व जवान बॉलिवूडचे गाणे गाण्याचा प्रयत्न करताना दिसतात खरे...पण तो प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. काय आहे ते चॅलेंज आणि काय आहे त्यांची प्रकृती बिघडण्यामागचं कारण? जाणून घ्या सविस्तर
लष्कराच्या जवानांनी कैलाश खेर यांचे गाणे गाण्याचा प्रयत्न केला
लष्कराच्या जवानांनी ऑनलाइन चॅलेंज स्वीकारून ते कॅमेऱ्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, लष्करी जवान हे पायऱ्यांवर बसलेत आणि त्यांनी बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचे लोकप्रिय गाणे 'सैयान' गाण्याचा प्रयत्न केला. जेव्हा सैन्याचे सैनिक गाणे सुरू करतात तेव्हा लोक मोठ्या उत्सुकतेने पाहतात, पण हा क्रम जसजसा पुढे जातो तसतसे मागे बसलेले लष्कराचे जवान थोडे घाबरतात आणि सुरात गाण्याऐवजी हसायला लागतात.
'हाय पिच' गाणे गाताना सैनिकांची कॅमेऱ्यासमोर उडाली भंबेरी
कैलाश खेर सारख्या उंच आवाजात 'सैया' गाणे गाणं जवानांच्या चांगलच अंगलट आलंय. हाय पिच गाणे म्हणायला सुरुवात करताच आवाजात गडबड होऊ लागते, हे मजेदार चॅलेंज पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरून हसाल. हे आव्हान आजमावून पाहताना सैनिकांची भंबेरी उडते. एक-दोन लोक वगळता कोणीही 'सैया' गाणं पूर्णपणे गाऊ शकत नाही. हा एक मिनिट 43 सेकंदाचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड पाहिला जात आहे. नरेश लिंबू तुंबाहांगफे नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- China : गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांशी झालेल्या झटापटीत चीनचे 38 सैनिक ठार, मृतांची आकडेवारी लपवणाऱ्या चीनचा बुरखा फाटला
- Budget 2022 : सीमेवर चीन-पाकिस्तानसोबत तणाव; संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या तरतुदी
- अपहरण केलेल्या तरुणाला चीन भारताकडे सोपवणार, प्रोटोकॉलचे पालन करणार
- US Canada Border : चार भारतीयांचा गोठून मृत्यू, बेकायदेशीरपणे अमेरिका-कॅनडा सीमा ओलांडण्याचा प्रयत्न