India destroyed Pakistan Air Defence System: पाकिस्तानच्या एका ॲक्शनवर भारताने रिएक्शन दिली आणि अवघा लाहोर उघडा पडला आहे. भारताच्या या रिएक्शनवर पाकिस्तान पुढे आणखी काही केले, तर पाकिस्तान चार दिवस ही युद्ध लढू शकणार नाही. पाकिस्तान नष्ट होईल, असे वक्तव्य निवृत्त एअर व्हाइस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी केले आहे. हवेतून कुठलाही हल्ला झाला, तर त्याला रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एअर डिफेन्स सिस्टीम (Air Defence) असतो. एअर डिफेन्स सिस्टीममध्ये अनेक सेंसर, अनेक वेगवेगळ्या आकाराच्या रडार्स, तसेच शत्रूच्या विमान किंवा मिसाईलला रोखण्यासाठी काही मिसाईल्सही असतात. आणि सीमेपासून बराच आत या सिस्टीमचा कंट्रोल सिस्टीम असतं, तिथे त्या भागाचा संपूर्ण हवाई चित्र दिसते. एअर डिफेन्स सिस्टीम उत्तम असेल तर कोणताही हवाई हल्ला हाणून पाडता येतो.
लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम निकामी झाल्यामुळे नक्कीच भारताची त्या ठिकाणी एअर सुप्रीमसी निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट करणे हे खूप मोठे यश आहे. पाकिस्तान वापरत असलेली चिनी बनावटीची एच क्यू 9 एअर डिफेन्स सिस्टीम चांगली होती. मात्र, ती आता खूप जुनी झाली आहे. त्या तुलनेत भारताची एस - 400 सिस्टीम लेटेस्ट आहे, फुलप्रूफ आहे. भारताच्या एस 400 सिस्टीमच्या तुलनेत चिनी बनावटीच्या एच क्यू 9 या एअर डिफेन्स सिस्टीमचे रडार चांगले नाहीत. त्यांची कम्युनिकेशन सिस्टीम चांगली नाही. त्याचे अपग्रेडेशन झालेले नाही, त्यामुळे पाकिस्तान संकटात सापडल्याचे मत निवृत्त एअर व्हाइस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी व्यक्त केले.
एअर डिफेन्स सिस्टीम हाताळणाऱ्या व्यक्तीचे कौशल्य महत्त्वाचे, पाकिस्तान कुठे चुकला?
एअर डिफेन्स सिस्टीम कितीही चांगली असली तरी त्याची हाताळणी करणारी, रडार इमेज पाहणारी मानवी बुद्धी अत्यंत महत्त्वाची ठरते. रडारवर मोठा विमानही काही मिलिमीटरचा दिसतो. भारताचे ड्रोन तर एका टिम्ब सारखे दिसले असावे आणि त्यात पाकिस्तानची चूक झाली. त्यामुळे एअर डिफेन्स सिस्टीम हाताळणारी मानवी बुद्धी ही किती महत्त्वाची ठरते हे यावरून दिसून येते. नक्कीच पाकिस्तान परिस्थिती आणखी चिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारत परिस्थिती एका मर्यादेपेक्षा जास्त चीघळेल असं होऊ देणार नाही.
पाकिस्तानने बुधवारी रात्री 15 ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारताने स्वतःच्या सुरक्षेसाठी एक आक्रमक पाऊल उचलले आणि ड्रोन हल्ले केले. आणि त्यात पाकिस्तानचा मोठं नुकसान झाले आहे. पाकिस्तानचे ॲक्शनची ही भारताची रिएक्शन आहे. भारताच्या या रिएक्शनवर पाकिस्तान आणखी परिस्थितीला चिघळेल. पाकिस्तानकडे युद्ध लढण्यासाठीची शस्त्रसामुग्री नाही. ते चार दिवसांच्या वर युद्ध लढू शकणार नाहीत. त्यामुळेच एक ड्रोन हल्ला होताच पाकिस्तानने इराणकडे मदतीसाठी धाव घेतली आहे, असे मत एअर व्हाइस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी म्हटले.
आणखी वाचा