India Pakistan War: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ बेचिराख झाले. सीमारेषेपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयालाही भारतीय सैन्याने लक्ष्य केले होते. यामध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अजहर याची आई आणि बहिणीसह 14 कुटुंबीय ठार झाले होते. साहजिक या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी 'खून की हर बूंद का बदला लेंगे, अशी दर्पोक्ती केली असली त्यांच्या अंतर्गत गोटात मात्र प्रचंड घबराट पसरल्याची माहिती आहे. कारण ऑपरेशन सिंदूर संपल्यानंतर काहीवेळातच पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि आयएसआय गुप्तचर संघटनेचे प्रमुख असीम मलीक यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी असीम मलीक यांनी फोनवर अजित डोवाल यांच्याकडे विनवणी केल्याचे समजते. परंतु, त्यांच्या संभाषणाचा नेमका तपशील समोर आलेला नाही.
पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केले. त्यांनी सांगितले की,पाकिस्तान आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेत (NSA) संपर्क झाला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणताही संवाद झालेला नाही. भारताने दहशतवाद आणि राजनैतिक चर्चा समांतर पातळीला सुरु राहू शकत नाहीत, अशी ठाम भूमिका घेतली होती. मात्र, ऑपरेशन सिंदूरमुळे धडकी भरलेल्या पाकिस्तानने लगेचच अजित डोवाल यांच्या माध्यमातून भारताशी संपर्क साधल्याचे समजते.
पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असीम मलिक यांनी फोनवर अजित डोवाल यांना काहीतरी विनवणी केल्याची माहिती आहे. परंतु, त्याचा तपशील कळू शकलेला नाही. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सावध असल्याने भारतीय सैन्याकडून इतकी मोठी कारवाई होईल, अशी अपेक्षा नव्हती. मात्र, पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेला चकवून भारतीय सैन्याने अचूकरित्या क्षेपणास्त्रांनी लक्ष्यभेद केला होता. त्यानंतर एकीकडे पाकिस्तानी पंतप्रधान बदला घेण्याची भाषा करत असले तरी पडद्याआडून पाकिस्तान भारताकडे विनवणी करत असल्याचे दिसत आहे.
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर नंतर भारताचा पाकिस्तानवर ड्रोन हल्ला
पाकिस्तानी लष्कराकडून एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, भारताने पाकिस्तानमधील 9 शहरांत ड्रोन हल्ले केले आहे. लाहोर, रावळपिंडी,कराची या शहारांत भारताकडून ड्रोन हल्ले करण्यात आले आहे. लाहोरमधल्या लष्करी तळावर भारतानं हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे.
आणखी वाचा
ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय सैन्य पाकिस्तानला पुन्हा दणका देणार, एअरफोर्सला सरकारचा फ्री-हँड