एक्स्प्लोर

हरक्युलस ते जॅग्वार, लढाऊ विमानांचा लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर युद्धाभ्यास

वायुदलाची 20 फायटर विमानं, सुखोई 30, हरक्युलस, जॅग्वार, मिराज आणि मिग यांसारख्या लढाऊ विमानांना महामार्गावर लँड होताना पाहणं, ही पर्वणी ठरत आहे.

लखनौ : युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास देशातल्या महामार्गाचा विमानांसाठी रन वे म्हणून वापर व्हावा, यासाठी लखनौ-आग्रा महामार्गावर हवाईदलाची लढाऊ विमानं टच डाऊन म्हणजेच लँडिंग करत टेक ऑफ करत आहेत. लखनौ-आग्रा हायवेवर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी एक-एक करुन लँडिंग केलं. वायुदलाची 20 फायटर विमानं, सुखोई 30, हरक्युलस, जॅग्वार, मिराज आणि मिग यांसारख्या लढाऊ विमानांना महामार्गावर लँड होताना पाहणं, ही पर्वणी ठरत आहे. युद्धस्थितीत रनवेचं नुकसान झाल्यास शत्रूवर पलटवार करण्यासाठी ही रणनीती महत्त्वाची ठरते. 1965 साली झालेल्या युद्धात पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी बॉम्ब टाकून भारताच्या एअरबेसची नासधूस केली होती. त्यामुळे भारतीय वायुसेनेला ऑपरेशन करताना अडचणी आल्या. आधुनिक युद्धशास्त्रात लढाऊ विमानांना लँडिंग ग्राऊंड म्हणून एक्स्प्रेस वे आणि हायवे वापरण्यास तयार केलं जातं. फक्त भारतच नाही, तर पाकनेही 2000 मध्ये अशा प्रकारचं ड्रिल केलं होतं. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, चीन, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या देशांनीही हा युद्धाभ्यास केला आहे. वायुदलाच्या युद्धाभ्यासामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत लखनौ-आग्रा महामार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. गेल्या वर्षी हवाईदलाच्या आठ लढाऊ विमानांनी इथून टेक ऑफ केलं होतं. आपत्कालीन परिस्थितीत लढाऊ विमानांना लँडिंगसाठी रनवे उपलब्ध नसल्यास लखनौ-आग्रा हायवेवर विमानांना लँडिंग करता यावं, यासाठी हा रनवे तयार करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget