Weather Forecast : देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठे उन्हाचा तडाका जाणवत आहे, तर कुठे अवकाळी पाऊस कोसळत आहे. याचा शेती पिकांना फटका बसत आहे. दरम्यानं, हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आजही देशातील विविध राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच तापमानात दोन ते तीन अंशाची घट होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.


या राज्यात आज अवकाळी पावसाची शक्यता


हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राजस्थान, मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब-हरियाणा, छत्तीसगड या राज्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. आजही देशातील काही राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये उत्तर भारतातील काही राज्यांचा समावेश आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब-हरियाणा, उत्तराखंड या राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय या राज्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर बिहार, बंगाल, झारखंड, सिक्किम आणि ओडिशा या राज्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


या महिन्याच्या अखेरीस उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढणार 


वेस्टर्न डिस्टर्बन्समुळं तापमानात घसरण झाली असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. आजपासून हवामानात बदल दिसून येत आहे. येत्या 24 तासांत वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव संपेल. त्यामुळं पुन्हा तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या महिन्याच्या अखेरीस उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येण्याचा अशारा देखील हवामान विभागानं दिला आहे. .


महाराष्ट्रातही अवकाळी पावसाची हजेरी


महाराष्ट्रातही काही भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील जळगाव, नांदेड, बुलढाणा या जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळं काही ठिकाणी शेती पिकांचे मोठं नुकसान झालं. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळं फळबागांसह रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये आंबा, द्राक्ष, केळी, संत्रा या फळबागांसह गहू, हरभरा, मका, मोहरी, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच भाजीपाला पिकालाही फटका बसला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंब्याची मोठी नासाडी झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Mango Farming : अवकाळी पावसाचा फळांच्या राजाला फटका, देशातील आंबा उत्पादक संकटात; यूपीसह या राज्यात मोठं नुकसान