India-US 2+2 Ministerial Meeting : भारत आणि अमेरिका यांच्यातील चौथी 2+2 मंत्रीस्तरीय चर्चा सोमवारी झाली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आणि संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन, भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात वॉशिंग्टनमध्ये ही चर्चा झाली. अफगाणिस्तान आणि आसपासच्या घटनांवर दोन्ही देशांच्या मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. जाणून घ्या सविस्तर
भारत-अमेरिकामध्ये 2+2 मंत्रीस्तरीय चर्चा!
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यावेळी म्हणाले की, या चर्चेत आम्ही अफगाणिस्तान आणि आसपासच्या घटनांबद्दल बोललो. भारतीय उपखंडातील अलीकडच्या घडामोडींचाही आमच्या संभाषणात समावेश होता. स्वतंत्र, मुक्त आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक कसे सुनिश्चित करावे? हे आमच्या अजेंड्यामध्ये होते. ते म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील चौथ्या 2+2 मंत्रिस्तरीय संवादात सहभागी होणे ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. 2+2 फॉरमॅटचा उद्देश आमची भागीदारी अधिक एकत्रित करणे आहे. एस. जयशंकर पुढे म्हणाले की, आमच्या भागीदारीचे महत्त्वाचे केंद्र इंडो-पॅसिफिक क्षेत्राशी संबंधित आहे. गेल्या एका वर्षात जोमाने काम करून क्वाडने नवीन उंची गाठल्याचे आपण पाहिले आहे. या संदर्भात आमची कामगिरी मोठ्या प्रमाणावर गाजली आहे.
अफगाणिस्तान, अंतराळ, अमेरिकन कंपन्यांना आमंत्रण
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेबद्दल सांगितले की, आम्ही अमेरिकन कंपन्यांसोबत सह-विकास आणि सह-उत्पादनाची इच्छा व्यक्त करतो आणि अमेरिकेच्या संरक्षण कंपन्यांना उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूच्या संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरमध्ये अधिक गुंतवणूक करण्याची विनंती करतो. तसेच आम्ही COMCASA (संचार सुसंगतता आणि सुरक्षा करार) आणि BECA (मूलभूत विनिमय आणि सहकार्य करार) च्या प्रभावी संचालनासाठी देखील प्रगतीशील आहोत. सिंह म्हणाले की, मी अमेरिकन कंपन्यांना संरक्षण, एरोस्पेस आणि मेक फॉर इंडिया आणि वर्ल्ड कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. तसेच आगामी काळात डिफेंस स्पेस आणि डिफेंस आर्टीफिशीयल इंटिलिजेंस, इतर अनेक उपक्रम आणि करार, जे चर्चेच्या टप्प्यात आहेत, आमच्या लष्करी सहभागाची व्याप्ती आणखी वाढवण्यासाठी करारामध्ये अर्थपूर्ण प्रगती झाली आहे.
'स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस करार'
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, भारताच्या अंतराळ विभाग आणि यूएसएच्या संरक्षण विभागादरम्यान एक 'स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस करार' देखील पार पडला आहे. ते म्हणाले की, इंडो-पॅसिफिक आणि हिंदी महासागर क्षेत्रातील शांतता, स्थिरता आणि विकासासाठी आमची भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे. बैठकीदरम्यान आम्ही आमच्या शेजारचे आणि हिंदी महासागर क्षेत्राचे आमचे मूल्यांकन देखील शेअर केले आहे.
अमेरिका काय म्हणाली?
अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड जेम्स ऑस्टिन म्हणाले की, या वर्षाच्या शेवटी प्रशिक्षण आणि व्यायामाद्वारे सायबर स्पेसमध्ये आमचे सहकार्य वाढवत आहोत. दोन्ही देशांमधील संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञान सहकार्य सातत्याने वाढत आहे. ते म्हणाले की, आज आमच्या दरम्यान द्विपक्षीय 'स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस' करार संपन्न झाला आहे हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. हे अंतराळातील अधिक माहितीची देवाणघेवाण आणि सहकार्यासाठी उपयुक्त ठरेल. ऑस्टिन म्हणाले की, सखोल माहितीची देवाणघेवाण आणि औद्योगिक सहकार्यासह द्विपक्षीय संरक्षण प्राधान्यांच्या श्रेणीवर चर्चा करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तसेच आमचे सैन्य कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे.
द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन म्हणाले की, सुरक्षित आणि प्रभावी कोविड लस विकसित करण्यासाठी आमचे शास्त्रज्ञ आणि संस्था एकत्र काम करत आहेत. क्वाड लस भागीदारीद्वारे संपूर्ण इंडो-पॅसिफिकमध्ये लस उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही ऑस्ट्रेलिया आणि जपानमधील आमच्या भागीदारांसोबत काम करत आहोत. ते म्हणाले की जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वात जुनी म्हणून आम्ही आमच्या लोकांना संधी, सुरक्षा, स्वातंत्र्य आणि सन्मान प्रदान करण्यासाठी दररोज एकत्र काम करतो. ब्लिंकेन पुढे म्हणाले की, या 2+2 मंत्रिस्तरीय चर्चेने आमचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे,