Friday Prayers In Mosque: इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाने (Islamic Center of India) देशात शांतता आणि बंधुत्व राखण्यासाठी होळीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या प्रार्थनेच्या वेळेत बदल करण्याचे आवाहन मशिदींना केले आहे. इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया फरंगी महल आणि लखनौ (lucknow) इदगाहचे इमाम मौलाना खालिद रशीद यांनी बुधवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ''होळी, शब-ए-बरात आणि जुमा एकाच दिवशी पडत असल्याने, गंगा जमुना परंपरा लक्षात घेऊन. देशात शांतता सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत.''


त्यांनी मशिदींमध्ये शुक्रवारच्या नमाजाची वेळ बदलण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुस्लिमांना होळी दिवशी इतर मशिदींमध्ये न जाता आपापल्या भागातील मशिदींमध्ये नमाज अदा करण्यास सांगितले आहे. या आवाहनानंतर, जामा मशीद (Jama Masjid) इदगाह, मशीद ऐशबाग, अकबरी गेट येथील मिनारा मशीद, मशीद शाहमीना शाह आणि मशीद चौक यासारख्या प्रमुख मशिदींसह किमान 22 मशिदींनी शुक्रवारची नमाज दुपारी 1.30 अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.


होळी आणि शब-ए-बारात हे सण एकाच दिवशी येत असल्याने इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाने मुस्लिम बांधवाना सांगितले आहे की, त्यांनी सायंकाळी 5 वाजता होळी खेळण्याची वेळ संपल्यानंतरच मशिदीत व आपल्या प्रियजनांच्या कबरीवर जावे. तसेच फटाके फोडू नयेत, असे आवाहन ही त्यांनी मुस्लिम बांधवाना केले आहे. दरम्यान, चार वर्षांपूर्वीही अनेक सण एकत्र आयोजित केले जात होते. त्यावेळीही मौलवींनी जातीय सलोखा आणि शांतता राखण्यासाठी शुक्रवारच्या नमाजाच्या वेळेत बदल केले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: