Importing Tomatoes from Nepal : सध्या देशात मोठ्या प्रमाणावर टोमॅटोच्या दरात वाढ (Tomato Price) झाली आहे. बाजारात 150 ते 200 रुपये प्रतिकिलोनं टोमॅटोची विक्री केली जातेय. त्यामुळं या वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं नेपाळमधून टोमॅटोची आयात (Importing Tomatoes from Nepal) करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance minister Nirmala Sitharaman) यांनी दिली. आज नेपाळमधून भारतात टोमॅटोचा पहिला लॉट दाखल होणार आहे.  


उत्तर भारतातील वाराणसी, लखनौ आणि कानपूर टोमॅटो दाखल होणार 


देशात टोमॅटोच्या दरात विक्रमी वाढ होत असल्याचे अर्तमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या. त्यामुळं भारत आता नेपाळमधून टोमॅटो आयात करणार असल्याची माहिती सीतारामण यांनी लोकसभेत दिली. टोमॅटोचो आयातीचा पहिला लॉट आज उत्तर भारतातील वाराणसी, लखनौ आणि कानपूर शहरात पोहोचण्याची शक्यता असल्याचे त्या म्हणाल्या. घाऊक बाजारात टोमॅटोच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत टोमॅटोच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सध्या 150  ते 200 रुपये किलो दरानं टोमॅटोची विक्री केली जात आहे. 


पाऊस, तापमान वाढीसह विषाणूंचा टोमॅटोवर परिणाम


दरम्यान, अवकाळी पाऊस, जास्त तापमान आणि पिकावर झालेला विषाणूंचा प्रादुर्भाव याचा टोमॅटोवर  मोठा परिणाम झाला आहे. यामुळं अनेक ठिकाणी टोमॅटोचे पिक वाया गेले आहे. त्यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. पिकाचं नुकसान झाल्यामुळं बाजारात कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळं दरात वाढ होताना दिसत आहे. मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला याचा परिणाम दरांवर झाला आहे.  


टोमॅटोसह डाळींच्या किमंतीत वाढ झाल्यानं महागाई वाढली : आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास


टोमॅटोच्या किंमतीत झालेली वाढ तसेच तृणधान्ये, डाळींच्या किमंतीतही वाढ झाली आहे. त्यामुळं महागाई वाढल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Governor Reserve Bank of India Shaktikanta Das) यांनी दिली.  ते चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत बोलत होते. भाज्यांच्या दरात लक्षणीय वाढ होत आहे. जून आणि जुलै महिन्यात टोमॅटोच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळं महागाई वाढल्याचे दास म्हणाले. दरम्यान, कमी पाऊस, उच्च तापमान आणि विषाणूचा प्रादुर्भाव यामुळं टोमॅटोच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांनी दिलीय. 


महत्त्वाच्या बातम्या:


Success Story : तीन बंधूंची कमाल! 25 एकरात टोमॅटोची शेती, आज टँकरने पाणीपुरवठा, 2 कोटींपेक्षा अधिकचं उत्पन्न?