Manipur Violence : मणिपूरमध्ये 3 मेपासून सुरू झालेल्या हिंसाचारामुळे (Manipur Violence) राज्याला मोठा फटका बसला आहे. मात्र, आता राज्यातील परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत सामान्य झाली आहे. राज्यात आता बुलेट प्रूफ जॅकेटची मागणी वाढली असून, याआधी एका महिन्यात दोनपेक्षा जास्त बुलेट प्रूफ जॅकेटची विक्री होत नव्हती. आता 30 ते 50 जॅकेटची विक्री होत आहे. 


मणिपूरमध्ये परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात जॅकेट ऑर्डर करत आहेत. सततच्या आदेशांबाबत एका स्थानिक दुकानदाराने एबीपी न्यूजला सांगितले की, 'आम्ही बुलेट प्रूफ जॅकेटची आधी विक्री करत नव्हतो. पण, ही समस्या निर्माण झाल्यापासून आम्ही त्याची विक्री सुरू केली आहे.' एवढी मागणी पहिल्यांदाच होत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक लोक हे जॅकेट्स खरेदी करण्यासाठी येत आहेत. म्हणूनच आम्ही कपड्यांबरोबर जॅकेटचीही विक्री करतो.  


लोक मोठ्या प्रमाणात जॅकेट खरेदी करत आहेत


दुकानदाराने सांगितले की, यापूर्वी त्यांनी दुकानात फक्त 20-30 जॅकेट्स ठेवले होते. परंतु सध्या परिस्थिती अशी आहे की, खरेदीसाठी येणारे ग्राहक एकावेळी 15 ते 20 जॅकेट्स खरेदी करतायत. "विक्री पाहता आम्ही आता वेगवेगळ्या डिझाईन्सची जॅकेट ऑर्डर करायला सुरुवात केली आहे. तसेच आम्ही आता अधिक ऑर्डर करत आहोत". अशीही प्रतिक्रिया दुकानदाराने दिली आहे. 


जॅकेटची किंमत किती आहे?


आणखी एका दुकानदाराने सांगितले की, "लोक ही जॅकेट मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. आम्ही 30 पेक्षा जास्त नगांची विक्री करतो. त्याची किंमत 3000 ते 3500 रुपयांपर्यंत आहे. पण जर ऑर्डर जास्त असेल तर आम्ही 3000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत देखील विकू." जॅकेट खरेदी करणाऱ्यांचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान आहे.


जॅकेट लोकांचे रक्षण करते


एका स्थानिक रहिवाशाने सांगितले, "जेव्हा आम्ही आमच्या जोडीदारांना मदत करण्यासाठी हिंसाचारग्रस्त भागात जातो तेव्हा हे जॅकेट आमचं संरक्षण करतं. हे जॅकेट्स घातल्यानंतर फार आरामदायी वाटतात तसेच आम्हाला ते परिधान करून खूप छान वाटतं. आम्ही फार दूर राहतो आणि कधी कधी फ्रंटलाईनचा सामना करायला लागल्यावर जे जॅकेट्स आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत.  


जॅकेटमध्ये बुलेट प्रूफ प्लेट नाही 


बुलेट प्रूफ जॅकेटचे विविध प्रकार आहेत. प्रत्येक वयोगटासाठी आणि लढ्यासाठी ते वेगळे आहेत. तसेच, त्याच्या आर्मर प्लेटमध्ये फरक आहे. याशिवाय त्याचे वजनही गरजेनुसार बदलते. या जॅकेटमध्ये बुलेट प्रूफ प्लेट नाही. असे असूनही गोळीचा हल्ला छातीपर्यंत येऊ देत नाही.


महत्त्वाच्या बातम्या : 


मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा लेखी आदेश, पोलीस अधिकाऱ्यांचीही भूमिका तपासणार