एक्स्प्लोर

भारताचं गव्हाचं जहाज इराणमार्गे अफगाणिस्ताकडे रवाना

इराणमधील ज्या चाबहार बंदराच्या विकासासाठी भारताने कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे, त्याच बंदरामुळे आता इराणसह अफगाणिस्तान हे तिन्ही देश एकमेकांच्या अगदी जवळ आले आहेत.

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारताचं गव्हाचं जहाज इराणधील चाबहार बंदरामार्गे अफगाणिस्तानकडे रवाना झालं आहे. व्यापारासाठी भारताने पहिल्यांदाच इराणमधील चाबहार बंदराचा वापर केला आहे. भारत, इराण आणि अफगाणिस्तान या तिन्ही देशांतील व्यापारी संबंध आणखी दृढ होण्यासाठी या समुद्रमार्गे गहू निर्यातीचा मोठा वाटा ठरणार आहे. इराणमधील ज्या चाबहार बंदराच्या विकासासाठी भारताने कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे, त्याच बंदरामुळे आता इराणसह अफगाणिस्तान हे तिन्ही देश एकमेकांच्या अगदी जवळ आले आहेत. https://twitter.com/MEAIndia/status/924564479928549376 भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री सलाहुद्दीन रब्बानी आणि इराणचे परराष्ट्र मंत्री जावेद झरीफ यांनी रविवारी (29 ऑक्टोबर) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकमेकांशी संवाद साधला आणि भारत-अफगाणिस्तान व्हाया चाबहार बंदर या मार्गाला हिरवा कंदिल दाखवला. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या करारानुसार भारत 11 लाख टन गहू अफगाणिस्तानला पुरवणार आहे. तो गहू घेऊन भारताचं जहार चाबहार बंदरामार्गे रविवारी अखेर रवाना झालं. याआधी पाकिस्तानामार्गेच भारत-अफगाणिस्तानमधील व्यापार होत असे. मात्र आता चाबहार बंदरामार्गे व्यापार होणार असल्याने इराणशीही भारताला थेट संपर्कात राहणं शक्य होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Allahabad HC Decision : मुस्लिम पर्सनल लॉ कायद्यांपेक्षा मोठा नाही; बालविवाह आणि पोक्सो संदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
मुस्लिम पर्सनल लॉ कायद्यांपेक्षा मोठा नाही; बालविवाह आणि पोक्सो संदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Badrinath Temple : अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; समिती अध्यक्षांच्या सचिवाचं निलंबन 
अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; समिती अध्यक्षांच्या सचिवाचं निलंबन 
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
Ayodhya Ram Mandir: राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टच्या खजिनदारांना संताप अनावर; कर्मचाऱ्यांकडून पत्रकाराला धक्काबुक्की, मुलाखत थांबवण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टच्या खजिनदारांना संताप अनावर; कर्मचाऱ्यांकडून पत्रकाराला धक्काबुक्की, मुलाखत थांबवण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Embed widget