Chandrayaan-3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गेल्या 15 वर्षांत तीन चांद्रमोहिमा अंतराळात पाठवल्या आहेत. 2009 मध्ये शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा चांद्रयान-1 च्या डेटाचा वापर करून चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशातील सर्वात गडद आणि थंड भागात बर्फाचे अंश शोधले होते.
चांद्रयान-1 ही भारताची पहिली चांद्रमोहीम
चांद्रयान-1 ही भारताची पहिली चांद्रमोहीम होती. 22 ऑक्टोबर 2008 रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून याची सुरुवात करण्यात आली होती. भारत, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्वीडन आणि बल्गेरिया मधील 11 वैज्ञानिक उपकरणे चंद्राच्या रासायनिक, खनिजशास्त्रीय आणि फोटो-जिओलॉजिकल मॅपिंगसाठी पृष्ठभागापासून 100 किमी उंचीवर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारी ही अंतराळयान मोहीम होती. मोहिमेतील सर्व महत्त्वाच्या बाबी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर मे 2009 मध्ये ही कक्षा 200 किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली. या उपग्रहाने चंद्राभोवती 3,400 हून अधिक प्रदक्षिणा घातल्या. या मोहिमेचा कालावधी दोन वर्षांचा होता आणि 29 ऑगस्ट 2009 रोजी यानाशी संपर्क तुटल्याने ती अकाली रद्द करण्यात आली होती.
इस्रोचे तत्कालीन अध्यक्ष जी. माधवन नायर म्हणाले, 'चांद्रयान-1 ने 95 टक्के उद्दिष्टे साध्य केली होती. एका दशकानंतर ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हरचा समावेश असलेल्या चांद्रयान-2 चे 22 जुलै 2019 रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ऑर्बिटरवरील पेलोड आणि चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग आणि रोटेशनच्या तंत्रज्ञानाद्वारे वैज्ञानिक अभ्यासाचे प्रदर्शन करणे हा देशाच्या दुसऱ्या चांद्र मोहिमेचा उद्देश होता. प्रक्षेपण, क्रिटिकल ऑर्बिटल एक्सरसाईज, 'डी-बूस्ट' आणि 'रफ ब्रेकिंग' टप्पा यांसह तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाचे बहुतेक घटक यशस्वीरित्या पूर्ण झाले. चंद्रावर पोहोचण्याच्या शेवटच्या टप्प्यात लँडर रोव्हरसह क्रॅश झाले, ज्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा हेतू साध्य होऊ शकला नाही.
नायर यांनी सोमवारी पीटीआयला सांगितले की, "आम्ही खूप जवळ होतो, परंतु शेवटच्या दोन किलोमीटरमध्ये चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग यशस्वीरित्या होऊ शकले नाही. मात्र, लँडर आणि रोव्हरपासून विभक्त झालेली ऑर्बिटरची आठही वैज्ञानिक उपकरणे डिझाईननुसार काम करत असून मौल्यवान वैज्ञानिक माहिती देत आहेत.
2009 मध्ये चंद्रावर पाण्याचा शोध ही एक महत्त्वपूर्ण घटना
चांद्रयान-2 चे ऑर्बिटर आणि चांद्रयान-3 चे चांद्रमॉड्यूल यांच्यात दुतर्फा यशस्वी संवाद झाल्याची माहिती इस्रोने सोमवारी दिली. 2009 मध्ये चंद्रावर पाण्याचा शोध लागणे ही एक महत्त्वपूर्ण घटना होती ज्यानंतर शास्त्रज्ञांनी भारताच्या चांद्रयान -1 वरील उपकरणाच्या डेटाचा वापर करून चंद्राच्या मातीच्या सर्वात वरच्या थरामध्ये पाण्याच्या अस्तित्वाचा पहिला नकाशा तयार केला. चंद्राच्या भविष्यातील शोधासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरेल, असे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.
'सायन्स अॅडव्हान्सेस' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेला हा अभ्यास चंद्राच्या मातीतील पाणी आणि त्याच्याशी संबंधित आयन हायड्रॉक्सिल च्या 2009मध्ये झालेल्या प्राथमिक शोधावर आधारित आहे. हायड्रॉक्सिलमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा प्रत्येकी एक अणू असतो.
नासाचे मून मिनरलॉजी मॅपर 2008 मध्ये चांद्रयान-1 सोबत पाठविण्यात आले होते. भारताच्या चांद्रयान-1 मोहिमेने गोळा केलेल्या माहितीचा वापर करून नासाने चंद्राच्या पृष्ठभागाखाली लपलेल्या पाण्याचे साठे शोधून काढले आहेत.
चांद्रयान-3 आज चंद्रावर लँड होणार, भारताच्या मोहिमेकडं जगाचं लक्ष
आजचा दिवस आणि संध्याकाळी सहा वाजून 4 मिनिटांची वेळ हा ऐतिहासिक क्षण भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. कारण याच क्षणी भारताच्या भाळी ऐतिहासिक यशाचा टिळा लागणार आहे. याला कारण ठरतंय भारताची चांद्रयान-3 मोहीम. संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं भारताचं चांद्रयान-3 आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांच्या ठोक्याला चंद्रावर लॅण्ड होणार आहे. त्यानंतर चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :