नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांचा विचार करता आज देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत अंशत: घट झाल्याचं दिसून येतंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 28 हजार 591 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली तर 338 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 34 हजार 848 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्या आधी शुक्रवारी देशात 33 हजार 376 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 338 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
केरळमध्ये रुग्णांचे आणि मृत्यूचे प्रमाण अधिक
देशातील शनिवारच्या रुग्णसंख्येची तुलना करता एकट्या केरळमध्ये 20 हजार 487 रुग्णांची भर पडली आहे तर 181 लोकांचा मृत्यू झाला आहे. याचसोबत राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 43.55 लाख इतकी झाली आहे. त्यामध्ये आतापर्यंत 22 हजार 844 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra Corona Update : राज्यात आज 3, 075 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 35 जणांचा मृत्यू
देशातील कोरोनाची सद्यस्थिती :
- कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 32 लाख 36 हजार 921
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 24 लाख 09 हजार 345
- सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 84 हजार 921
- एकूण मृत्यू : चार लाख 42 हजार 655
- एकूण लसीकरण : 73 कोटी 82 लाख 07 हजार 378 लसीचे डोस
राज्यातील स्थिती
राज्यात शनिवारी 3075 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 056 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 02 हजार 816 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 05 टक्के आहे.
राज्यात शनिवारी 35 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 49 हजार 796 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12, 949 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.