India Coronavirus Updates : देशातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा रुग्णसंख्येचा आलेख वर जाताना दिसतोय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात कोरोनाच्या 26 हजार 727 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 277 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात एकूण 28 हजार 246 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्या आधी बुधवारी देशात 23 हजार 529 रुग्णांची नोंद झाली होती तर 311 जणांचा मृत्यू झाला होता.


देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी एकट्या केरळमध्ये 15 हजार 914 रुग्णांची नोंद झाली असून 122 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रुग्णसंख्या काही केल्या कमी येत नाही ही चिंतेची बाब आहे. गेल्या आठवड्यात नोंद झालेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी एकट्या केरळमध्ये 60 टक्के रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 


देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने चांगलाच वेग घेतल्याचं दिसून येतंय. आतापर्यंत एकूण 89 कोटीहून जास्त डोस देण्यात आल्याची नोंद झाली आहे. काल एकाच दिवसात देशात 64 लाख 40 हजार 451 डोस देण्यात आले.


देशातील सध्याची कोरोना स्थिती : 



  • कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 37 लाख 66 हजार 707

  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 30 लाख 43 हजार 144

  • सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : दोन लाख 75 हजार 224

  • एकूण मृत्यू : चार लाख 48 हजार 339

  • देशातील एकूण लसीकरण : 89 कोटी 02 लाख 08 हजार 007 डोस


राज्यातील स्थिती 
राज्यात गुरुवारी  3,063 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर 56 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासात 3 हजार 198  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 71  हजार 728  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.27 टक्के आहे. 


महत्वाच्या बातम्या :