नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नसून नव्या रुग्णांची मोठी आकडेवारी समोर येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात कोरोनाची 25 हजार 467 नव्या रुग्णांची भर पडली असून 354 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी 39 हजार 486 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी सोमवारी देशात 25,072 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती, तर 389 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता.
देशातील सध्याची कोरोनास्थिती :
- कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 24 लाख 74 हजार 773
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 17 लाख 20 हजार 112
- सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 19 हजार 551
- एकूण मृत्यू : चार लाख 35 हजार 110
- एकूण लसीकरण : 58 कोटी 89 लाख 97 हजार 805 लसीचे डोस
देशातील 1.6 कोटी वेळेत लोकांना कोरोनाचा दुसरा डोस नाही
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 58.82 कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यामधील पहिला डोस घेतलेल्या किमान 1.6 कोटी लोकांना 16 आठवड्यांच्या आत दुसरा डोस मिळाला नसल्याचं समोर आलं आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या एक कोटीहून अधिक आहे. उरलेल्या नागरिकांमध्ये 45 वर्षांवरील नागरिकांची संख्या जास्त आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात काल 3,643 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6 हजार 795 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 38 हजार 794 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.05 टक्के आहे.
राज्यात काल 105 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 43 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 49 हजार 924 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 11,746 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर नंदुरबारमध्ये रुग्णसंख्या शून्यावर आहे. राज्यातील एकूण 15 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (44), नंदूरबार (0), धुळे (8), परभणी (14), हिंगोली (61), नांदेड (35), अमरावती (89), अकोला (15), वाशिम (9), बुलढाणा (29), यवतमाळ (13), वर्धा (6), भंडारा (6), गोंदिया (4), गडचिरोली (27) या पंधरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
महत्वाच्या बातम्या :