मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्याची चर्चा करायला, संवाद साधायला कुणाला आवडणार नाही? अनेकांची ही इच्छा आता पूर्ण झाली असून अॅमेझॉनने आपल्या अलेक्सावर अमिताभ बच्चन यांचा आवाज लॉन्च केला आहे. गुगल असिस्टंट आणि सिरी कडे वळणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अॅमेझॉनने ही शक्कल लढवली असून 19 ऑगस्टपासून ही सेवा लॉन्च करण्यात आली आहे. 


 






अमिताभ बच्चन यांचा आवाज Alexa वर कसा सुरु करायचा? 
अॅमेझॉनने आपली बहुचर्चित सेवा असलेल्या Alexa वर अमिताभ बच्चन यांच्या आवाजाला लॉन्च केलं आहे. वापरकर्त्यांना हा  आवाज सुरु करायचा असेल तर त्यांना 149 रुपये इन्ट्रोडक्टकरी किंमत भरावी लागेल. त्यानंतर वापरकर्त्यांना ही सुविधा एक वर्षापर्यंत अनुभवता येईल. 


Alexa वर आपल्याला अमिताभ बच्चन यांचा आवाज सुरु करायचा असेल तर आपल्या आवाजात  “Alexa, introduce me to Amitabh Bachchan” असं म्हणावं लागेल. या व्यतिरिक्त आपल्याला थेट अॅमेझॉनच्या साईटवरुनही ही सुविधा खरेदी करता येईल. पेमेंट केल्यानंतर आपल्याला Alexa वरुन अमिताभ बच्चन यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळेल. 


 






ही सुविधा सुरु करताना आपल्याला “Amit ji” हा वेकअप की वर्ड वापरावा लागेल. त्यासाठी आपल्याला आपल्या आवाजात “Alexa, enable Amit ji wake word” असं म्हणावं लागेल. त्यानंतर Alexa बाय डिफॉल्ट काम करेल. 


गेल्या वर्षी अॅमेझॉनने Alexa वर अमिताभ बच्चन यांचा आवाज आणणार असल्याची घोषणा केली होती. त्याचा उद्देश अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना तसेच बॉलिवूडच्या चाहत्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा होता. 


महत्वाच्या बातम्या: