Coronavirus Updates : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत हळूहळू घट होताना दिसत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाची रुग्णसंख्या 20 हजारांच्या आत आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मंगळवारी देशात 18 हजार 870 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 378 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासात 28 हजार 178 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्या आधी सोमवारी देशात 18 हजार 795 रुग्णांची भर पडली होती तर 179 जणांचा मृत्यू झाला होता.


एकट्या केरळमध्ये मंगळवारी 11 हजार 196 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 149 जणांना आपला जीव गमवावा लागला. 


Maharashtra Corona Update : राज्यात आज 2, 844 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97.26 टक्के


देशातील सध्याची कोरोना स्थिती : 



  • कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 37 लाख 16 हजार 451

  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 29 लाख 86 हजार 180

  • सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : दोन लाख 82 हजार 520

  • एकूण मृत्यू : चार लाख 47 हजार 751

  • देशातील एकूण लसीकरण : 87 कोटी 66 लाख 63 हजार 490 डोस


राज्यातील स्थिती : 


राज्यातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात मंगळवारी 2844 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर 60 रुग्णांचा मृत्यू झाला. काल 3 हजार 029  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 65  हजार 277  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.26 टक्के आहे. 


मुंबईत गेल्या 24 तासात 394 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 477 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,18,813 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4611 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1200 दिवसांवर गेला आहे


Vaccine For Children: सीरम इंस्टिट्यूटला मिळाली 7 ते 11 वर्षांच्या मुलांवर कोरोना लसीच्या ट्रायलला परवानगी