नवी दिल्ली: भारताच्या सीममधून पाकिस्तानमध्ये एक सुपरसोनिक मिसाईल फायर केल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. हे मिसाईल 9 मार्च रोजी डागण्यात आलं असून ते पाकिस्तानच्या तब्बल 124 किमीपर्यंत गेल्याचंही पाकिस्तानकडून सांगण्यात आलं. भारताने ही गोष्ट अपघाताने घडली असल्याचं मान्य केलं आणि त्यावर खेद व्यक्त केला आहे.


तपासाचे आदेश दिले
संरक्षण मंत्रालयाने यावर एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. भारत सरकारने हे प्रकरण गंभीरपणे घेतल्याचं त्यामध्ये सांगण्यात आलंय. हे मिसाईल पाकिस्तानच्या सीमेमध्ये पडल्याचं संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण ही गोष्ट अपघाताने घडली असून भारताकडून यावर खेद व्यक्त करण्यात आला आहे. नियमित देखरेख करताना तांत्रिक बिघाड झाल्याने ही घटना घडल्याचं संरक्षण मंत्रालयाने आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. 


पाकिस्तानवर चुकून डागण्यात आलेले हे मिसाईल ब्रम्होस असल्याचं सांगण्यात येतंय. हे मिसाईल हरियाणातील सिरसा एअर बेसवरून फायर करण्यात आल्याचंही सांगण्यात येतंय. 


पाकिस्तानचे गंभीर आरोप
भारताकडून चुकून डागण्यात आलेलं हे मिसाईल पाकिस्तानच्या मियॉं चन्नू या ठिकाणी पडलं. या ठिकाणापासून केवळ 160 किमीवर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरचे घर आहे. बुधवारी पाकिस्तानमध्ये हे मिसाईल पडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. 


पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा मोरक्या मसूद अझहर हा 2019 साली झालेल्या पुलवामा घटनेचा मास्टरमाईड होता. त्याच्या बहावलपूरमधील घरापासून 160 किमीवर भारताचं हे मिसाईल पडलं. पुलवामा घटनेनंतर भारतीय सेनेने जैशसा बालाकोट या ठिकाणाचा दहशतवादी अड्डा नष्ट केला होता.


बुधवारी पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन भारतावर गंभीर आरोप केले होते. शुक्रवारी इस्लामाबादमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. या घटनेवरून पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मंहम्मद कुरेशी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले. 


महत्त्वाच्या बातम्या :