quadcopter shot down by BSF : पाकिस्तान सीमेवरुन सातत्याने भारताविरुद्ध कारस्थाने केली जात आहेत. कारण एक पाकिस्तानी ड्रोन भारताच्या हद्दीत घुसल्याची घटना घडली. मात्र, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ड्रोनच्या दिशेने गोळीबार सुरु केला आणि ड्रोन पाडले.  सोमवारी पहाटे 2.55 वाजण्याच्या सुमारास पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये हे ड्रोन दिसले होते. ड्रोनसोबतच प्रतिबंधित असलेली अमली पदार्थांची 5 पाकिटेही जप्त करण्यात आली आहेत.


दरम्यान, फिरोजपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानातून भारतात काहीतरी संशयास्पद उडत असल्याचा आवाज ऐकू आला. यानंतर सीमा सुरक्षा दलाला तत्काळ सतर्क करण्यात आले. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी ड्रोनच्या दिशेने गोळीबार करुन हे ड्रोन खाली पाडले. 


याआधी शनिवारी बीएसएफने जम्मूमध्ये संशयित पाकिस्तानी ड्रोन पाहिल्यावर त्यावर गोळीबार केला होता. बीएसएफच्या जवानांनी पहाटे 4.10 च्या सुमारास उडणाऱ्या संशयास्पद वस्तू अरनियाच्या नागरी क्षेत्रात प्रवेश केल्यावर त्यावर गोळीबार केला होता. अरनिया परिसरात पहाटे बीएसएफच्या जवानांना एका संशयास्पद ड्रोनचा आवाज आला होता. त्यानंतर जवानांनी आवाजाच्या दिशेने गोळीबार केला होता. त्यानंतर आज पुन्हा पाकिस्तानच्या हद्दीतून भारतीय हद्दीत एक ड्रोन आल्याची घटना घडली आहे. दरम्यान, ड्रोनला एक छोटी हिरवी पिशवी जोडलेली होती. त्या पिशवीमध्ये पिवळ्या फॉइलने बांधलेले चार पॅकेट आणि काळ्या फॉइलने बांधलेले एक लहान पॅकेट होते. संशयित प्रतिबंधित पदार्थाचे पॅकिंगसह वजन सुमारे 4.17 किलो होते. काळ्या फॉइलमध्ये गुंडाळलेल्या पॅकेटचे वजन सुमारे 250 ग्रॅम होते. ड्रोनचे मॉडेल DJI Matrice 300 RTX होते. काही महिन्यांपूर्वी विदेशी शस्त्रास्त्रांचा साठाही पाकिस्तानातून पंजाबमध्ये नेण्यात आला होता. पंजाब पोलिसांच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेलने (एसएसओसी), पिस्तुलांची मोठी खेप जप्त केली होती. त्यामुळे राज्यात दहशतवादी घटना वाढवण्यासाठी दहशतवादी फंडिंग आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचा पाकिस्तानचा डाव उघड झाला.


दरम्यान, पोलिसांच्या मदतीने परिसराची नाकेबंदी करण्यात आली  आहे. आणखी  शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. बीएसएफच्या जवानांनी ड्रोन पाहिल्यानंतर 10 मिनिटांत सुमारे 18 गोळ्या झाडल्याची माहिती अधिकऱ्यांनी दिली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: