Coronavirus Cases Today in India : सणासुदीच्या काळात देशातील कोरोनाचा आलेख (India Corona Update) घटताना पाहायला मिळत आहे. ही एक दिलासादायक बाब आहे. देशात कोरोना संसर्गात घट झाली असली तरी कोरोनाचा धोका कायम आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Ministry of Health) आकडेवारीनुसार, देशात 2 हजार 401 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात काल 2 हजार 430 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 17 रुग्णांचा (Corona Death) मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत 29 रुग्णांची घट झाली आहे, परंतु उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली आहे.
गेल्या 24 तासांत 21 कोरोनाबाधितांचा मृत्यू
एकीकडे देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत असल्याचं चित्रं असलं तरी दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झालेली दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 21 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. काल 15 ऑक्टोबर रोजी 17 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर त्याआधी 14 ऑक्टोबर रोजी 25 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. कोरोना रुग्णांच्या मृत्यूची ही आकडेवारी चिंताजनक आहे.
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढली
कोरोना रुग्णांच्या मृत्यूप्रमाणे देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची (Active Cases) संख्याही वाढली आहे. देशात सध्या 26 हजार 625 इतकी झाली आहे. शनिवारी देशात सक्रिय रुग्णांची संख्या 26 हजार 618 इतकी होती. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही किंचिंत वाढ झाली आहे. सध्या देशातील पॉझिटीव्हीटी रेट 0.06 टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.76 टक्के आहे.
कोरोनाचे नवे दोन व्हेरियंट
ओमिक्रॉन दोन नवीन सबव्हेरियंट BF.7 आणि BA.5.1.7 आढळून आले आहेत. हे व्हेरियंट चीनमध्ये आढळले आहेत. कोरोनाचे नवे सबव्हेरियंट ओमिक्रॉनपेक्षा अधिक धोकादायक आणि संसर्गजन्य असल्याचा धोका शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यातच आता हवामान बदलाचा काळ आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.