मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Eelection) पार्श्वभूमीवर विरोधीपक्षांच्या इंडिया (INDIA) आघाडीची तिसरी बैठक ही मुंबईत होणार आहे. या बैठकीमध्ये इंडियाच्या चिन्हाचं देखील अनावरण होणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे की, 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी इंडियाच्या चिन्हाचे अनावरण करण्यात येणार आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, "इंडिया आघाडीचं चिन्ह हे सर्वांसाठी प्रेरणादायी असणार आहे. तसेच या चिन्हाचं 31 ऑगस्टला सायंकाळी सात वाजता ग्रँड हयातला अनावरण होणार आहे. त्यामुळे आता आमच्यावर घाव घालणं किंवा आरोप करणं सगळ्यांनाच महागात पडणार आहे."
ठाकरे गट करणार बैठकीचं आयोजन
विरोधी पक्षांची मुंबईत जी बैठक पार पडणार त्याचं आयोजन शिवसेना (ठाकरे गट) कडून करण्यात येणार आहे. याआधी राऊत म्हणाले होते की, "मुंबईत होणाऱ्या बैठकीचं आयोजन उद्धव ठाकरे करणार आहेत." तसेच या बैठकीमध्ये इंडियाच्या चिन्हाचं देखील अनावरण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, "या चिन्हामध्ये इंडियाची खास झलक सर्वांना पाहायला मिळणार आहे. या चिन्हामध्ये सर्वांना बांधून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. याशिवाय पूर्वेकडील काही राज्यांमधील पक्ष देखील या आघाडीमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे."
'एनडीएचे पक्ष इंडियामध्ये सामील होणार'
याशिवाय एनडीमधील काही पक्ष इंडिया आघाडीमध्ये सामील होणार असल्याचा दावा काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे. काँग्रेसेचे नेते अलोक शर्मा यांनी म्हटलं आहे की, "एनडीच्या बैठकीमध्ये सामील झालेले काही पक्ष काहीच दिवसांमध्ये विरोधी पक्षांच्या गटामध्ये सामील होणार आहेत. तसेच येणाऱ्या कालावधीमध्ये विरोधी पक्षांकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात येणार आहेत." मुंबईत 1 सप्टेंबर रोजी मुंबईत विरोधी पक्षांच्या आघाडीची बैठक पार पडणार आहे. यासाठी मुंबईत जोरदार तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. तसेच बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जातात हे देखील पाहणं गरजेचं आहे.
हेही वाचा :