India coronavirus cases : देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना महाराचीचं सावट गडद झाले आहे. दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी देशभरात 90 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णाची नोंद झाली. दिवसागणिक वाढत्या कोरोना रुग्णाच्या संख्येमुळे अनेक राज्यात निर्बंध लावण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट न झाल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्लीसह केरळ आणि तामिळनाडूमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्याही मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट अधिक गडद होऊ शकते. पाहूयात आज, कोणत्या राज्यात किती रुग्ण आढळले....
महाराष्ट्रात 36,265 नव्या रुग्णांची नोंद -
महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज एकाच दिवसात 36,265 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 8,907 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
दिल्लीत कोरोनाचा स्फोट -
राजधानी दिल्लीमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या दिवसागणिक वाढतच आहे. गुरुवारी राज्यात 15 हजार 97 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढून 15.34 टक्के इतका झाला आहे. दिल्लीतील अॅक्टिव रुग्णाची संख्या 31 हजार 498 इतकी झाली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे.
पश्चिम बंगालमध्ये 15 हजारांपेक्षा जास्त रुग्ण -
पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये 15 हजार 421 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. तर 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच कालावधीत सात हजार 343 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
तामिळनाडू -
तामिळनाडूमध्ये गुरुवारी 6 हजार 983 कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. तर 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच कालावधीत 721 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील अॅक्टिव रुग्णाची संख्या 22 हजार 828 इतकी झाली आहे.
कर्नाटक -
कर्नाटक राज्यात गुरुवारी पाच हजार 31 नव्या रुग्णाची भर पडली आहे. याच कालावधीत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज बंगळुरुमध्ये चार हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे.
केरळ -
केरळमध्ये आज 4649 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत 2180 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील अॅक्टिव रुग्णाची संख्या 25,157 इतकी झाली आहे.
गुजरात -
गुजरातमध्ये आज 4 हजार 213 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 860 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अॅक्टिव रग्णाची संख्या 14 हजारांपेक्षा जास्त झाली आहे.
झारखंडमध्ये काय स्थिती?
झारखंडमध्ये गुरुवारी 3,704 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत 435 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आसाम -
आसाम राज्यात गुरुवारी 844 नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. तर दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत 132 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आसाममध्ये सध्या 2689 अॅक्टिव रुग्ण आहेत. राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 2.37 टक्के इतका झाला आहे.
उत्तराखंड -
उत्तराखंडमध्ये गुरुवारी 630 नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. तर 3 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत 128 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील अॅक्टव रुग्णाची संख्या 1425 इतकी झाली आहे.
आंध्र प्रदेश -
आंध्र प्रदेश राज्यात आज 547 नव्या कोरोना रुग्णाची नोंद. राज्यातील एकूण अॅक्टव रुग्णाची संख्या 2,266 इतकी झाली आहे.
हिमाचल प्रदेश -
हिमाचल प्रदेशमध्ये गुरुवारी एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. याच कालावधीत 60 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज 498 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. हिमाचल प्रदेशमधील अॅक्टिव रुग्णाची संख्या 1655 इतकी झाली आहे.
बिहार -
पाच जानेवारी रोजी बिहारमध्ये 379 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. राज्यातील अॅक्टिव रुग्णाची संख्या 5,785 इतकी झाली आहे.
जम्मू-काश्मीर -
जम्मू काश्मिरमध्ये आज 349 नव्या रुग्णाची भर पडली आहे. तर 116 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज आढळलेल्या रुग्णापैकी 202 रुग्ण जम्मूमधील आहेत तर 147 रुग्ण काश्मिरमधील आहेत. अॅक्टिव रुग्णाची संख्या 2049 इतकी झाली आहे.
चंदीगढ -
चंदीगढमध्ये गुरुवारी 331 नव्या कोरोना रुग्णाची भर पडली आहे. तर 17 जणांनी कोरोनावर मात केली आहे. चंदीगढचा पॉझिटिव्हिटी रेट 7.61% इतका झाला आहे. चंदीगढमध्ये 979 अॅक्टिव रुग्ण आहेत. चंदीगढमध्ये आज 15 ते 18 वयोगटातील 14,490 मुलांनी लस घेतली आहे.
पुद्दुचेरीमध्ये आज 139 नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3.58 टक्के इतका झाला आहे. राज्यातील अॅक्टिव रुग्णाची संख्या 399 इतकी झाली आहे.