एक्स्प्लोर

डोकलाम वाद : सिक्कीम, अरुणाचल सीमेवर भारतानं सैन्य वाढवलं!

चीन वारंवार युद्धाची धमकी देत असल्यानं भारतानंही सीमेवर आपलं सैन्य पाठवलं आहे.

नवी दिल्ली : डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर भारतानं अधिकचं सैन्य सीमेवर पाठवलं आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबाबतच्या वृत्ताला दुजोराही दिला आहे. चीनकडून वारंवार मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर भारतानं हे मोठं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या सीमेवर भारतानं अधिकचं सैन्य तैनात केलं आहे. पीटीआयनं याबाबतच वृत्त दिलं आहे. आतापर्यंत या भागात मोजकेच सैनिक भारतानं तैनात केले होते. मात्र, चीन वारंवार युद्धाची धमकी देत असल्यानं भारतानंही सीमेवर आपलं सैन्य पाठवलं आहे. दरम्यान, असं असलं तरीही डोकलाममध्ये मात्र, अधिक जवान तैनात करण्यात आलेले नाहीत. डोकलाम परिसरात रस्ता बनवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांच्या या गोष्टीला भारतानं विरोध केला आहे. भूताननं देखील चीनला विरोध केला आहे. 'डोकलाम हा तुमचा नाही तर आमचा भाग आहे.' असं म्हणत भूतानने चीनला तोंडावर पाडलं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काही दिवसापूर्वी डोकलाम हा आपलाच भाग असून, भूताननंही मान्य केल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज भूताननं चीनला हे प्रत्युत्तर दिलं आहे. चीननं या भागात रस्ता निर्मिती करणं हे 1988 आणि 1998 च्या कराराचं उल्लंघन असल्याचंही भूतानने म्हटलं आहे. भूतानने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, 16 जून 2017 रोजी चीनी सैन्याने डोकलाम भागात रस्त्याचं काम सुरु केलं. मात्र चीनकडून 1988 आणि 1998 च्या सीमासुरक्षा कराराचं उल्लंघन होत आहे. दरम्यान, चीन सातत्याने डोकलाम हा आपलाच भाग असल्याचा दावा करत आहे. मात्र त्याला भूतानची पुष्टी नव्हती. पण भूताननेही मान्य केल्याचा खोटारडेपणा चीनने माध्यमांसमोर व्यक्त केला होता. आता भूतानच्या दाव्यामुळे चीन चांगलंच तोंडावर आपटलं आहे. वादाची सुरुवात चीनने जेव्हा चुंबी खोऱ्यात याटुंगमध्ये डोकलाम परिसरात रस्ते बांधणीचं काम हाती घेतलं. त्यावेळी भारतानं त्याचा कडाडून विरोध केला. पण चीननं या विरोधाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. म्हणून या भागावर लक्ष ठेवण्यासाठी भारतानं दोन बंकर उभारले. पण चिनी सैन्यानं भारताचे हे दोन्ही बंकर उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारतीय लष्कराने आपली ‘रिइनफोर्समेंट’ म्हणजे लष्कराची एक मोठी तुकडी या भागात तैनात केली, त्यानंतर दोन्ही देशातील सैन्यात तणाव वाढला. संबंधित बातम्या : डोकलाम आमचाच, भूतानने चीनला तोंडावर आपटलं! भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’ युद्धासाठी तयार राहा, चीनच्या राष्ट्रपतींचे लष्कराला आदेश आमच्या लष्कराला हरवणं अशक्य, चिनी लष्कराच्या प्रवक्त्याची दर्पोक्ती भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’ बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेत चीनची भारताला धमकी …तर पाकिस्तानच्या विनंतीवर काश्मीरमध्ये सैन्य घुसवू : चीनी मीडिया चिनी दूतावासाकडून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी ‘ट्रॅव्हल अलर्ट’ जारी G-20 : मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट, डोकलाम प्रश्नावरही चर्चा : सूत्र चीनच्या ‘ड्रॅगन’वर भारताच्या ‘रुक्मिणी’ची नजर सिक्कीममधून भारताने सैन्य हटवावं, चीनच्या उलट्या बोंबा …अन्यथा 1962 पेक्षा गंभीर परिणाम भोगावे लागतील, चिनी मीडियाची पुन्हा धमकी हिंदी महासागरात चीनच्या कुरापती, युद्धनौका तैनात

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Boat Accident : भयंकर दुर्घटना! अंत्यसंस्काराच्या जेवणाला जात होते अन्... गंगेत नाव उलटून 13 जणांचा मृत्यू; अनेक बालकांचा समावेश
भयंकर दुर्घटना! अंत्यसंस्काराच्या जेवणाला जात होते अन्... गंगेत नाव उलटून 13 जणांचा मृत्यू; अनेक बालकांचा समावेश
Mamata Banerjee : मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; दारुच्या नशेत आलेल्या महिलेने शिव्या दिल्या, साडी ओढली अन्... 
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; दारुच्या नशेत आलेल्या महिलेने शिव्या दिल्या, साडी ओढली अन्... 
राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, SIR च्या नावाखाली ते घुसखोरांना संरक्षण देतायेत, अमित शाहांचा हल्लाबोल 
राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, SIR च्या नावाखाली ते घुसखोरांना संरक्षण देतायेत, अमित शाहांचा हल्लाबोल 
JDU BJP Merger Controversy : नितीश कुमार यांचा JDU पक्ष भाजपमध्ये विलीन होणार? तारीख निश्चित झाल्याचा दावा, बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ
नितीश कुमार यांचा JDU पक्ष भाजपमध्ये विलीन होणार? तारीख निश्चित झाल्याचा दावा, बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget