India Coronavirus Updates : जागतिक महामारी कोरोना (Coronavirus) मुळे चीनमध्ये (China) हाहाकार माजला असतानाच, भारतासाठी (India Cororna Update) मात्र दिलासादायक बातमी ऐकायला मिळत होती. गेल्या एक महिन्यापासून कोरोनाचा आलेख सातत्याने घसरत असतानाच आज देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे. जरी आता हा आकडा 200 च्या खाली असला तरी आज देशात कोरोना संसर्गाचे 185 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एकाचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 185 नवीन रुग्ण
गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 185 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एका व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याची बातमी आहे. याआधी बुधवारी देशात कोरोना संसर्गाची 131 रुग्णसंख्या समोर आली होती. तर एकाला आपला जीव गमवावा लागला होता. कालच्या तुलनेत, दररोज नवीन बाधित रुग्णांच्या संख्येत 54 ची वाढ नोंदवली गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी म्हणजेच 22 डिसेंबर 2022 आकडेवारी जारी केली आहे, या दरम्यान 190 लोकांना कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्यात यश आले. त्यामुळे देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 402 झाली आहे. गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णांच्या संख्येत 8 ची घट नोंदवण्यात आली आहे.
बरे होणाऱ्यांची संख्या 4 कोटी 41 लाख 42 हजार 432
त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 4 कोटी 46 लाख 76 हजार 515 झाली आहे. तर बरे होणाऱ्यांची संख्या 4 कोटी 41 लाख 42 हजार 432 इतकी झाली आहे. त्याच वेळी, देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे एकूण 5 लाख 30 हजार 681 लोकांचा मृत्यू झाला आहे.
देशातील कोरोनाची आतापर्यंतची ताजी स्थिती
एकूण सक्रिय प्रकरणे - 3 हजार 402
आतापर्यंत एकूण बाधित - 4 कोटी 46 लाख 76 हजार 515
आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण - 4 कोटी 41 लाख 42 हजार 432
आतापर्यंत एकूण मृत्यू - 5 लाख 30 हजार 681
देशातील रिकव्हरी रेट 98.80 टक्के
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामधून बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. आता देशातील रिकव्हरी रेट 98.80 टक्के झाला आहे. त्याच वेळी, एकूण संसर्गाच्या 0.01 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. तर मृत्यू दर 1.19 टक्के आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटवरील उपलब्ध माहितीनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड-19 विरोधी लसींचे 220 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
2020 मध्ये देशात एक कोटींचा आकडा पार
9 ऑगस्ट 2020 रोजी भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. 16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली. 19 डिसेंबर 2020 रोजी कोरोना रुग्णसंख्येने देशात एक कोटींचा आकडा पार केला होता. गेल्या वर्षी 4 मे रोजी बाधितांची संख्या दोन कोटींच्या पुढे गेली होती आणि 23 जून 2021 रोजी ती तीन कोटींच्या पुढे गेली होती. यावर्षी 25 जानेवारी रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे चार कोटींच्या पुढे गेली होती.
इतर बातम्या
Corona : 'केवळ मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच नाही, तर 'या' गोष्टींचीही काळजी घ्या' सरकारडून जारी 'एप्रोप्रिएट बिहेविअर' काय आहे?